Wheat Sowing : पुणे विभागात गव्हाची ८८ टक्के पेरणी

नगर जिल्ह्यात आठ हजार ६३६ हेक्टरवर पेरणी
Wheat Sowing
Wheat Sowing Agrowon
Published on
Updated on


पुणे ः सध्या राज्यात किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीसाठी उशिराने का होईना, पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला. आत्तापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी एक लाख ४८ हजार ९०७ म्हणजेच ८८ टक्के पेरणी झाली असून, पिके जोमात असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Wheat Sowing
Rabi Sowing : पुणे विभागात रब्बीच्या सरासरी ५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा आहे. गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे पुरेसा वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली. सध्या अनेक ठिकाणी गहू पिके वाढीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ हे तालुके गव्हाच्या पिकासाठी ओळखली जात असून विभागात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातही चांगल्या पेरण्या झाल्या असून, आत्तापर्यंत सर्वाधिक गव्हाची पेरणी श्रीरामपूर तालुक्यात झाली आहे. सुमारे आठ हजार ६३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहुरी, कोपरगाव या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे. जामखेड, संगमनेर, अकोले, राहाता, शेवगाव या तालुक्यांत पेरण्या काहीशा कमी झाल्या आहेत.

Wheat Sowing
पुणे विभागात गव्हाची ४९ टक्के पेरणी

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सर्वाधिक गव्हाची चार हजार ८७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ बारामती, जुन्नर, शिरूर, दौंड या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. तर, हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर तालुक्यांत कमी पेरण्या झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सुमारे १७ हजार १४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यातही चांगलीच
पेरणी झाली आहे.
पुणे विभागात झालेली
गव्हाची पेरणी, हेक्टरमध्ये
जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्केवारी
नगर ८६,४०५ ६९,२७८ ८०
पुणे ३९,८०३ २३,२८८ ५९
सोलापूर ४२५८८ ५६,३४१ १३२
एकूण १,६८,७९६ १,४८,९०७ ८८
------------------------

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com