Water Storage : नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांत ८३ टक्के पाणीसाठा

पाटबंधारे विभागाची माहिती; दमदार झालेल्या पावसामुळे साठा उपलब्ध
Water Storage
Water StorageAgrowon

नांदेड : जिल्ह्यात यंदा झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे दोन मोठ्या प्रकल्पासह नऊ मध्यम व ८० लघू प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत ६०५.३३ दशलक्ष घनमीटरनुसार ८३.१३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ६३१.३१ दलघमीनुसार ८६.६८ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

Water Storage
Water Storage: जायकवाडी पाणीसाठा 60 टक्क्यांवर

जिल्ह्यात चालू वर्षी पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या नंद्यासह नाल्यांना पूर आला होता. यामुळे पावसाळ्यात संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा जुलै महिन्यात ६०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, सर्वच नद्यांना पूर आला होता. यामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पांत जुलैमध्येच समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रकल्पात ६८.३६ दलघमीनुसार ८४.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ११८.१८ दलघमीनुसार ८५.५१ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात १४९.९२ दलघमीनुसार ८७.०६ टक्के पाणीसाठा आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्यात ३.४५ दलघमीनुसार ४६.३२ टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पात १४४.३५ दलघमीनुसार ८३.५२ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात १६.१२ दलघमीनुसार ८.५० टक्के पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत ६०५.३३ दशलक्ष घनमीटरनुसार ८३.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ८०६.०५ दलघमीनुसार ९९.५४ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ४१.४० दलघमीनुसार ५१.१४ टक्के पाणीसाठा आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पेनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ९०९.०१ दलघमीनुसार ९४.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी ६८.३६ ८४.६१

मानार ११८.१८ ८५.५१

मध्यम प्रकल्प (९) १४९.९२ ८७.०६

लघू प्रकल्प (८०) ११४.३५ ८३.५२

उच्चपातळी बंधारे (९) १४९.९२ ७८.९९

को.प.बंधारे (चार) ३.४५ ४६.३२

एकूण प्रकल्प १०४ ६०५ ८३.१३

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ८०६.५ ९९.५४

सिद्धेश्‍वर ४१.४० ५१.१४

इसापूर ९०९.०१ ९४.२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com