Nafed Market : यवतमाळला नाफेडची ७ नोंदणी केंद्रे

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात सात केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
Nafed Market
Nafed MarketAgrowon
Published on: 
Updated on: 

यवतमाळ : आधारभूत किंमत खरेदी (Purchase) योजनेअंतर्गत नाफेडमार्फत (Nafed Market) मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात सात केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग (Marketing) फेडरेशनमार्फत ती सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.

महागाव तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा तालुका खरेदी- विक्री समिती, झरीजामणी-बळीराजा फळे-फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद किसान मार्केट यार्ड शेलू (बु), आर्णी शेतकरी कृषी खासगी बाजार दत्तरामपूर, दिग्रस खरेदी-विक्री समिती, बाभूळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राची प्रतीक्षा होती. सध्या सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळत आहे. हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळू नये, यासाठी केंद्र निश्‍चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी चार नोव्हेंबर ते शासनाकडून अंतिम मुदतीचा आदेश प्राप्त होईपर्यंत करण्यात येत आहे.

ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, ७/१२ उतारा, पीकपेरा व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स संबंधित खरेदी केंद्रावर द्यावी लागणार आहे. मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

Nafed Market
Excess Chana Stock मुळे NAFED ची गोची?|Chana Bajarbhav | ॲग्रोवन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.