Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon

Agriculture Electricity : बारामती परिमंडळाकडून दोन वर्षांत ६१ हजार शेतीसाठी वीजजोडण्या

गेल्या दोन वर्षांत महावितरण बारामती परिमंडळाने शेतीपंपाच्या वीजजोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण ६१ हजार ७९४ वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे.
Published on

Pune News पुणे ः गेल्या दोन वर्षांत महावितरण (Mahavitaran) बारामती परिमंडळाने शेतीपंपाच्या (Agriculture Pump) वीजजोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण ६१ हजार ७९४ वीजजोडण्या (Electricity Connection) देण्याचे काम केले आहे.

३० मीटर अंतरातील प्रतीक्षा यादी जवळपास संपली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून जोडणीचे ठिकाण ३० मीटरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करून कोटेशन भरावे, अशा सर्व शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत वीजजोड देण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिमंडळातील अभियंत्यांना दिले आहेत.

शेतीपंपाच्या जोडणीकरिता एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणले.

या धोरणानुसार दोन वर्षांत जी वसुली झाली त्यातील ३३ टक्के ‘कृषी आकस्मिक निधी’ गावपातळीवर व ३३ टक्के निधी जिल्हा पातळीवर उपलब्ध झाला. त्यातून प्रलंबित जोडण्या देणे व वीज यंत्रणा सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले.

Agriculture Electricity
Electricity Bill : वीजबिल वसूलीसाठी शेतकऱ्यांवर कसलीही सक्ती नाही: देवेंद्र फडणवीस

अंतरानुसार प्रलंबित जोडण्याची संख्या पाहिली असता ३० मीटरच्या आतील ५० हजार ३१३ जोडण्यांपैकी ५० हजार ८९ जोडण्या आजपर्यंत दिल्या आहेत.

३१ ते २०० मीटर अंतरातील १२ हजार १६० पैकी ९२६२, तर २०१ ते ६०० मीटरपर्यंतच्या ७५१० पैकी २३२४ जोडण्या दिल्या आहेत.

याशिवाय ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ११९ शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे वीजजोडणी देण्याचे काम महावितरण बारामती परिमंडळाने केले आहे. तसेच उर्वरित जोडण्या देण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

Agriculture Electricity
Agriculture Management : शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी : आबिटकर

शाखा कार्यालयात संपर्क साधावा

ज्या शेतकऱ्यांची ३० मीटर अंतरातील जोडणी प्रलंबित आहे किंवा ज्यांना नव्याने अर्ज करायचा असेल त्यांनी नजीकच्या महावितरण शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नवीन जोडणी देण्यात येईल, असे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सांगितले.

२४ वीज उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर

कृषी आकस्मिक निधीतून बारामती परिमंडळात सद्यःस्थितीत २४ वीज उपकेंद्रांचे काम हाती घेण्यात आले आहे. तर, उपकेंद्रातील अतिउच्चदाब रोहित्राची क्षमतावाढ केली आहे. परिणामी महावितरणची भार क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करणे व नवीन जोडण्या देणे शक्य झाल्याचे सुनील पावडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com