Marathwada Crop Damage : मराठवाड्यात अवकाळीचा ६० हजार हेक्टरला दणका

मार्चमधील अवकाळीची स्थिती; मदतीसाठी ८४ कोटींची गरज
 Crop Damage
Crop DamageAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मार्च महिन्यात अवेळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीमुळे १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांच्या ६० हजार ४०२.४४ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये २४ हजार ६१५.३५ हेक्टरवरील जिरायत, ३० हजार ३४८ हेक्टरवरील बागायत, तर ५ हजार४३८.

१९ हेक्टरवरील फळ पिकांचा (Fruit Crop) समावेश आहे. प्रचलित भरपाईच्या नियमानुसार मदतीसाठी मराठवाड्याला ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे महसूल प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मार्चमध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.

सुरुवातीला १ लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. परंतु पंचनाम्यानंतर ६० हजार ४०२.४४ हेक्टर क्षेत्रावरील विविध शेती पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

 Crop Damage
Marathwada Crop Damage Survey : मराठवाड्यात ६५ हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे

जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा...शेतकरी...बाधित क्षेत्र...अपेक्षित निधी (कोटी रुपये)
छ.संभाजीनगर...३५०१५...१३५३५.०७...२२.१७
जालना...४२१५...१९६९.४९..३.६७
परभणी...५९९९...३९६०.८१...४.३७


हिंगोली... ६५२६... ३८३८.७२...६.४
नांदेड...३६५४३...२१५७९.५०...३०.५२.


बीड...८५०३...३८०२.०२...५.९९
लातूर...२२५६५...१०३६७.८३..१०.५६
धाराशिव...२६५२...१३४९...१.३९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com