Cashew Crop Damage : असनिये येथील आगीत ६०० काजू कलमे जळाली

बांदा परिसरात पाचशे काजूची झाडे जळाल्याचा प्रकार ताजा असतानाच मंगळवारी (ता. ७) असनिये येथे पुन्हा आग लागली.
Fire
FireAgrowon

Fire In Cashew Orchard Sindhudurg ः जिल्ह्यातील असनिये (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत दिनकर चंद्रकांत सावंत यांच्या काजू (Cashew) बागेतील ६०० कलमे जळाली. यात त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.

बांदा परिसरात पाचशे काजूची झाडे (Cashew Tree) जळाल्याचा प्रकार ताजा असतानाच मंगळवारी (ता. ७) असनिये येथे पुन्हा आग लागली.

Fire
Mango Board : काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’

आगीत बागायतदार सावंत यांची ६०० झाडांची काजू बाग पूर्णपणे जळाली. आग लागल्याचे समजताच सावंत कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

परंतु वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. सध्या काजुचा हंगाम सुरू असून काजू झाडांवर मोठ्या प्रमाणात असलेले काजू बीदेखील जळून गेले.

Fire
Cashew Crop : मडुरा बाबरवाडीत आगीत काजूची ४० झाडे जळाली

सावंत यांनी मेहनतीने उभी केलेली बाग जळाली. या आगीचे कारण समजू शकले नाही. कृषी सहायक अतुल माळी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

बांदा परिसरातील देऊळवाडी भरडाला ५ एकरांमधील ५०० हून अधिक काजूची झाडे जळाली.

येथील बागायतदार तुकाराम मोरजकर, राजन मोरजकर, राजा सावंत, प्रमिला मोरजकर, सुंदर सावळ यांची काजूची, सागवान, जांभूळ झाडेदेखील जळाली. यात सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com