Kolhapur APMC Election : माघारीनंतर ५१ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून गुरुवारी (ता. २०) तब्बल ५८५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
Kolhapur APMC
Kolhapur APMCAgrowon

Kolhapur News कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून गुरुवारी (ता. २०) तब्बल ५८५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अर्ज माघारीनंतर समितीच्या १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात उतरले असून, महिला प्रतिनिधी, अर्थिकदृष्ट्या दुर्बल व भटक्या विमुक्त गटात दुरंगी लढतीचे तर अन्य गटात बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

या निवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार असून, मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी यांना शुक्रवारी (ता. २१) शाहू सांस्कृतिक भवनमध्ये पहिले प्रशिक्षण देण्यात आले. बाजार समितीसाठी ६६० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते.

Kolhapur APMC
Pune APMC Election : राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला एक जागेवर बोळवण

बुधवारी (ता. १९) दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना मिळून राजर्षी शाहू आघाडीच्या पॅनेलची घोषणा झाली. यात डावललेल्या उमेदवारांना घेऊन ठाकरे, शिंदे गटासह राष्ट्रवादीतील बंडखोर गटाच्या वतीने शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीच्या पॅनेलची घोषणा करण्यात आली.

Kolhapur APMC
Jalgaon APMC Election : जळगाव बाजार समितीतील उमेदवारांची नावे नेते जाहीर करेनात

दोन्ही पॅनेलमध्ये स्थान मिळालेल्या ३६ उमेदवारांसह अपक्ष १५ जणांनी अर्ज कायम ठेवून इतरांनी अर्ज माघारी घेतले. विकास संस्था गटातील ११, ग्रामपंचायत गटातील चार, आडते व्यापारी गटातील दोन व हमाल, मापाडी गटातील एक अशा १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

गटनिहाय रिंगणातील उमेदवार (कंसात निवडून द्यायचे उमेदवार)

विकास संस्था गट (एकूण जागा ११) - सर्वसाधारण - १७ (७), महिला प्रतिनिधी - ४ (२), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट - ३ (१), भटक्या विमुक्त - २ (१) ग्रामपंचायत गट - ४, सर्वसाधारण - ५ (२), अनुसूचित जाती गट - ३ (१), आडते व्यापारी - २ (८), हमाल-मापाडी - ७ (१).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com