Fertilizer Stock : हिंगोली जिल्ह्यात ५१ हजार टन रासायनिक खते शिल्लक

Fertilizer Shortage : जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामासाठी कृषी आयुक्तालयाकडून विविध ग्रेडचा ७७ हजार ६१० टन रायानिक खतसाठा मंजूर झालेला आहे.
Fertilizer stock
Fertilizer stockAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामासाठी कृषी आयुक्तालयाकडून विविध ग्रेडचा ७७ हजार ६१० टन रायानिक खतसाठा मंजूर झालेला आहे.जिल्ह्यात उपलब्ध व पुरवठा झालेल्या खतसाठ्यातून रविवार (ता. २५) अखेर पर्यंत १६ हजार ६ टन खतांची विक्री झाली असून ५१ हजार २४५ टन खतसाठा शिल्लक होता. युरिया व डीएपी मिळून १ हजार ३२० टनाचा बफर स्टॉक (संरक्षित खतसाठा) करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Fertilizer stock
Bogus Fertilizer : ‘केपीआर’च्या खतांचे पाच नमुने फेल

हिंगोली जिल्ह्यातील रासायनिक खतांचा सरासरी वापर ८१ हजार ५६९ टन आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामातील गरज लक्षात घेऊन विविध ग्रेडच्या ९५ हजार ७२९ टन खतांची मागणी करण्यात आली होती.

परंतु कृषी आयुक्तालयाने ७७ हजार ६१० टन खतसाठा मंजूर केला. त्यात युरिया १६ हजार १५१ टन, सुपर फॉस्फेट १५ हजार ४५१ टन, पोटॅश ४ हजार ३०० टन, डीएपी १२ हजार ९३९ टन, एनपीके २८ हजार ७१९ टन,अमेनियम सल्फेट ५० टन या खतांचा समावेश आहे.

ता. १ एप्रिल पासून आजवर ३४ हजार ५६९ टन खतांचा पुरवठा झाला. त्यात युरिया ३ हजार ६५८ टन, सुपर फॉस्फेट ६ हजार ३४९ टन, पोटॅश ८२४ टन, डीएपी १० हजार १०६ टन, एनपीके १३ हजार ६२० टन, अमेनियम सल्फेट २० टन या खतांचा समावेश आहे.

Fertilizer stock
Soybean Fertilizer Use : सोयाबीनला कोणती खते द्यावीत?

मार्च अखेर शिल्लक ३२ हजार ६८२ टन खते व यंदाच्या खरिपातील पुरवठा झालेली खते मिळून एकूण ६७ हजार २५२ टन खते उपलब्ध होती. त्यातून युरिया ४ हजार ९० टन, सुपर फॉस्फेट ३ हजार १६८ टन, पोटॅश १३९ टन, डीएपी ३ हजार ६३४ टन, एनपीके ४ हजार ९६५ टन, अमोनिया सल्फेट ८ टन एवढ्या खतांची विक्री झाली.

युरिया ६२० टन व डीएपी ७०० टन असा एकूण १ हजार ३२० टनाचा संरक्षित खतसाठा (बफर स्टॉक) करण्यात आला आहे. युरिया खतांची मागणी करण्यात आली आहे.लवकरच खतसाठा उपलब्ध होईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com