

Akola News : जिल्ह्यात या हंगामात मोजकाच होत आहे. या पावसामुळे सार्वत्रिक पेरण्यासुद्धा होऊ शकलेल्या नाहीत. जिल्ह्यात आजही सुमारे ६५ टक्के क्षेत्र हे पेरणीशिवाय पडून आले. शेतकरी पावसाच्या अपेक्षेने पेरणी करण्याचे धाडस करू लागलेला आहे.
खरीप हंगामाला प्रारंभ होऊन आता एक महिना पूर्ण झाला. या काळात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या.
दररोज पावसाचे ढग दाटून येतात. मात्र, पाऊस होत नसल्याने परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे. कमी पाण्यात पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अडचणीत सापडल्या. बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी खात्याकडे दाखल होत आहेत. सोयाबीन उगवणीचा प्रश्न यंदा बियाणे कंपन्यांसाठी डोकेदुखी बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकोला जिल्ह्याची पेरणी आता जेमतेम ३५ टक्के क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. चार लाख ५६ हजार हेक्टरपैकी एक लाख ६१ हजार हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकलेली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीनची सरासरी २ लाख १ हजार हेक्टरच्या तुलनेत एक लाख २ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली.
तर कपाशीची लागवड ४० हजार हेक्टरपर्यंत पोचली आहे. पेरण्यांना उशीर होत असल्याने कपाशीच्या लागवड क्षेत्रावर यंदा परिणामाची शक्यता वाढत आहे. कपाशीचे सरासरी क्षेत्र एक लाख ५१ हजार हेक्टर असून आजवर केवळ २६ टक्के म्हणजेच ४० हजार हेक्टरवर पेरणी पोहोचू शकली. खरिपात पावसाच्या पाण्यावर पिके अवलंबून असल्याने उत्पादनावर परिणामाची चिन्हे वाढू लागली.
अकोला जिल्ह्यात ५० टक्केही पाऊस नाही
जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किमान १३५ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित राहते. यंदाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत अवघा २९ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
यात अकोट तालुक्यात ३५.८, तेल्हारा २४.६, बाळापूर २९.९, पातूर ४०.५, अकोला २३.६, बार्शीटाकळी २५.२, मूर्तिजापूर ३२.३ इतका पाऊस नोंद झालेला आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत या प्रत्येक तालुक्यात यापेक्षा दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त पाऊस झालेला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.