Cows Died : विषारी वैरण घातल्याने ४ गायींचा मृत्यू, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Cows Died Poisoning : विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा गोठ्यात तडफडून मृत्यू झाला. यामुळे कागल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Cows Died Poisoning
Cows Died Poisoningagrowon
Published on
Updated on

Cows Died Due to Poisoning : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एका शेतकऱ्याच्याबाबत धक्कादायक प्रकार घडला आहे. कागलमधील साके या गावात काही अज्ञातांनी शेतात असणाऱ्या वैरणीवर विषारी औषध फवारले होते.

दरम्यान ती वैरण रान मालकाने आपल्या गायींना घातली. ही विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा गोठ्यात तडफडून मृत्यू झाला. यामुळे कागल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तानाजी सातापा गवसे व सुवर्णा तानाजी गवसे या शेतकरी कुंटुंबाने जीवापाड जपलेल्या गायींच्या मृत्यू झाला. यामुळे गावासह अख्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कागल तालुक्यातील साके येथे चार दिवसांपूर्वी अज्ञातांकडून वीस गुंठ्यातील झेंडूफूल शेतीवर विषारी औषध फवारण्यात आले होते. यामुळे बाग करपून गेली होती.

दरम्यान ही घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी येथील पैलवान तानाजी गवसे यांच्या कागल व्हनाळी रोडवर असणार्‍या भट्टाचा मळा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतातील वैरणीवर अज्ञात व्यक्तीने वाईट हेतूने विषारी औषध फवारले.

दरम्यान याबाबत गवसे यांना औषध फवारणी केली असल्याची कल्पना नसल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे ही वैरण आणून गवसे यांनी आपल्या गायींना घातली. गायींनी वैरण खाल्ल्यानंतर सुमारे तासाभराने चारही गायी तडफडू लागल्या. याबाबत गवसे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरीत डॉक्टरांना बोलावले.

Cows Died Poisoning
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर

जिल्हा परिषद व गोकुळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. पण उपचारा दरम्यान या गायींचा मृत्यू झाला. या घटनेने सर्व कुंटुंब हादरून गेले आहे. त्यातील एक गाय व वासरू दुसरा चारा घातल्यामुळे वाचले आहे.

साके येथील शेतकरी कुंटुंब आहे. शेती व जनावारांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तानाजी गवसे हे कुस्तीचे वस्ताद असून ते खेळाडू घडवत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन युवा संघटनेचे अनिल पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com