राजापूर, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील सागवे गोठीवरे परिसरात शनिवारी (ता. २८) लागलेल्या वणव्यामध्ये (Fire) या परिसरातील सुमारे ३५ शेतकऱ्यांच्या बागा (Horticulture Damage Due To Fire) भक्ष्यस्थानी पडल्या.
वेगाने भडकणाऱ्या वणव्यामधून ग्रामस्थांनी महत्प्रयासाने काही बागा वाचविल्या. तरीही, जळून खाक झालेल्या बागांमुळे तीस-पस्तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वणवा नेमका कसा लागला याचे निश्चित कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
वेगाने वाढत जाणाऱ्या आणि वाऱ्यासोबत भडकलेल्या या वणव्यामध्ये या परिसरातील रमाकांत मोंडे, विजय रोकडे, श्री. करंजवकर, चंद्रकांत झोरे, नीलेश हळदणकर, गितेश बांबरकर, नार्वेकर, अनंत सोडये यांच्यासह ३५ शेतकऱ्यांच्या बागांमधील हजारो आंबा कलमे जळून खाक झाली. त्यामध्ये तीस ते पस्तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शनिवारी तालुक्यातील सागवे गोठीवरे परिसरात सकाळी १० च्या सुमारास वणवा लागला. तासागणिक वाढत जाणारे ऊन आणि त्याला मिळालेली वाऱ्याची साथ यामुळे वणव्याने रौद्ररूप धारण केले.
वणवा गोठीवरे फाटा ते ऐरमवाडीपर्यंत सुमारे ५ किमी परिसरात पसरला. वेगाने पसरणारा वणवा आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांसी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र, त्याला यश येत नव्हते.
यामध्ये अनेकांच्या हापूस आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले. अनेकांच्या, उटी, गवताचे भारे जळून खाक झाले. आजूबाजूच्या गावातून आगीचे लोट दिसत होते.
दुपारनंतर अथक प्रयत्नांती ग्रामस्थांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. काही शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागा अन् झाडे वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले;
मात्र, शेतकऱ्यांनी रचून ठेवलेल्या वैरणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जनावरांचा आगामी काळातील वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे;
मात्र, नुकसानीचा रविवारी सायंकाळपर्यंत पंचनामा झाला नसल्याने ग्रामस्थांमधून त्याबाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेली तीन वर्षे सतत वणव्याच्या घटना घडत असून त्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.