Agriculture Department : परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३४ टक्के पदे रिक्त

Agriculture Department Recruitment : यंदाच्या जून अखेर विविध संवर्गातील २१८ पदे (३४.०६ टक्के) रिक्त झाली आहेत. जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांची २९५ पैकी ८० पदे (२७.११ टक्के) रिक्त आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on: 
Updated on: 

Parbhani News : कृषी विभागाच्या परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत पदांच्या आकृतिबंधानुसार विविध संवर्गातील एकूण मंजूर ६४० पदांपैकी ४२२ पदे (६५.९३ टक्के) भरलेली आहेत. यंदाच्या जून अखेर विविध संवर्गातील २१८ पदे (३४.०६ टक्के) रिक्त झाली आहेत.

जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांची २९५ पैकी ८० पदे (२७.११ टक्के) रिक्त आहेत. जिंतूर, पाथरी, पालम या तालुक्यांतील कृषी सहाय्यकांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळावर अतिरिक्त कामांचा ताण वाढला आहे.शेती व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीस अडचणी येत आहेत.

परभणी जिल्ह्यात कृषी सहाय्यकांची एकूण २९५ पदे मंजूर आहेत.त्यात ९ तालुक्यांसाठी कृषी सहाय्यकांच्या २७३ पदांचा समावेश आहे. उर्वरित २२ पदांमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळा, बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालय, जिल्हा फळरोपवाटिका येथील पदे आहेत.

Agriculture Department
Agriculture Department Nashik : बोगस बियाणांचा सुळसुळाट, तब्बल १३ लाखांचे बियाणे जप्त

परभणी तालुक्यातील कृषी सहाय्यकांची ४९ पैकी २ पदे, जिंतूर तालुक्यातील ४९ पैकी २४, सेलू तालुक्यातील २५ पैकी ८, मानवत तालुक्यातील २५ पैकी ४, पाथरी तालुक्यातील २५ पैकी १४, सोनपेठ तालुक्यातील २५ पैकी १, गंगाखेड तालुक्यातील २५ पैकी १०, पालम तालुक्यातील २५ पैकी १२, पूर्णा तालुक्यातील २५ पैकी ४ पदे रिक्त आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागातील रिक्त पदांमुळे कशी मिळणार गतिमान सेवा?

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत वर्ग १ ची ४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी जिल्हा कृषी उपसंचालकपद मार्च पासून रिक्त आहे. तालुका कृषी अधिकारी तथा तंत्र अधिकारी संवर्गातील १६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यांची ४ पैकी २ पदे तर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ९ पैकी पाथरी, पूर्णा या ठिकाणची २ पदे रिक्त आहेत. जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेतील तंत्र अधिकारी पद रिक्त आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्याची १ जागा रिक्त आहे.

कृषी पर्यवेक्षकांच्या ६२ पैकी पालम मधील २ व सोनपेठ मधील १ मिळून एकूण ३ पदे रिक्त आहेत. मंडल कृषी अधिकाऱ्यांची २२ पैकी परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम तालुक्यातील ४ पदे रिक्त आहेत. कृषी अधिकाऱ्यांची १६ पैकी ५ पदे रिक्त आहेत.

सहाय्यक अधीक्षकाचे १ पद,वरिष्ठ लिपिकांची ५, कनिष्ठ लिपिकांची १० पदे, आरेखाकाचे १, अनुरेखकाची ४५, लघुटंकलेखकाची २, वाहन चालकाची ८ पदे, प्रयोगशाळा सहाय्यकांची ३, स्वच्छकांची २, शिपायाची ३५, मजुराची ४, रोपमळा मदतनीसाची २, टिलर ऑपरेटरचे १ पद रिक्त आहे.

उपलब्ध मनुष्यबळावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कृषी विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत. त्यात कृषी सहाय्यकांची सर्व रिक्तपदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी कृषी विभागातील कर्मचारी संघटनांतर्फे करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.