Cow Milk
Cow MilkAgrowon

Cow Milk Rate : ३४ रूपये गायीच्या दुधाचा दर परवडणारा नाही? दूध उत्पादक शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

State Government : राज्य सरकारकडून दुधाचा किमान दर ३४ रुपये निश्चित करण्याचा विचार सुरू आहे.
Published on

Cow Milk Price : राज्यात मागच्या काही दिवसांपासून गायीच्या दुधाच्या दरावरून मोठा गोंधळ सुरू आहे. दरम्यान यासगळ्यात राज्य सरकारकडून दुधाचा किमान दर ३४ रुपये निश्चित करण्याचा विचार सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना हा दर परवडणारा नसल्याचे दिसून येत आहे. पशुखाद्यांच्या वाढलेल्या किंमती तसेच रोगराईमुळे गायीचा ३५ रूपये दर हा शेतकऱ्याला परवडणारा नाही. यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सध्याच्या घडीला गायीच्या दुधाला प्रतीलिटर ४० ते ४५ रूपये दर दिल्यास परवडू शकतो अशी भावना शेतकऱ्यांनी मांडली. दुधाचा उत्पादन खर्च सध्या सरासरी एका लिटरला ४० रूपयांच्या आसपास आहे. त्यामुळे सध्या मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत असल्याची खंत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सरकारकडून किमान दर निश्चित करताना ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफला ३५ रूपये दर दिला जातो. त्याच्यापेक्षा कमी फॅट असलेल्या दुधाला प्रत्येक पॉईंटला ५० पैसे कमी असा दर मिळतो. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. ३.५ फॅट व ८.० एसएनएफ असलेल्या दुधाला किमान ४० रुपये दर द्यावा असे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तर ३२ ते ३३ रूपये दर स्थिरावेल

राज्यात सध्या गायीच्या दुधाचा खरेदीदर सरासरी प्रतिलिटर ३२ रुपये आहे. मात्र, भुकटीचे दर प्रतिकिलो ३३० रुपयांवरून २५० रुपयांपर्यंत घसरले आहेत. तसेच, लोण्याचे भावदेखील प्रतिकिलो ४३० रुपयांवरून ३५० रुपयांपर्यंत गडगडले आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने तरी दुधाचा खरेदीदर ३२ ते ३३ रुपयांवर स्थिरावण्याची शक्यता असल्याची माहिती चितळे उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे यांनी माहिती दिली.

Cow Milk
Gokul Milk : अमूल, चितळेंना जमलं पण गोकुळला का नाही? चिठ्ठीवरचा कारभार कधी बंद होणार

गोकुळला ३५ रूपये देणे शक्य

सध्या राज्य शासनाकडून गायीच्या दुधाचा दर हा ३४ रूपये करण्याच्या निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही गोकुळ दूध संघाकडून सध्या ३५ रूपये दर देतो. देशभरात गायीच्या दुधाच्या उत्पदनात मोठी वाढ झाली आहे.

यामुळे खाजगी दूध संघाकडून दुधाची भुकटी करण्यासाठी गायीच्या दुधाचा वापर केला जातो त्यांनी दुधाचा दर कमी केला. यामुळे सध्या राज्य आणि केंद्र सरकारने यातून मध्य काढून योग्य तो निर्णय घेण्याची गरज असल्याचे कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी भूमिका मांडली.

हा दर परवडणारा नाही

याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे गावचे दूध उत्पादक युवक शेतकरी सम्मेद शिखरे यांच्यासोबत चर्चा केल्यास ते म्हणाले की, मागच्या एक वर्षात पशुखाद्याचे दर वारंवार वाढत गेले. याप्रमाणात गायीच्या दुधाचे दर वाढले नाहीत.

यामुळे सरकारने पशुखाद्याच्या दरावर नियंत्रण आणत गायीच्या दुधाला ४० रूपयांच्यावर दर द्यावा. याचबरोबर लम्पीसारख्या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे गायीच्या दुधाच्या दरात कपात केल्याने शेतकऱ्याचे बजेट कोलमडण्याची शक्यता शिखरे यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com