Electricity : पुणे जिल्ह्यात महावितरणने बदलले ३२४० रोहित्र

रब्बी हंगामात कृषिपंपाच्या वीज मागणीत जशी वाढ होते, तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात.
Electricity
Electricity Agrowon

Agriculture Electricity News पुणे : रब्बी हंगामात कृषिपंपाच्या (Agriculture झहसज) वीज मागणीत जशी वाढ होते, तसा महावितरणच्या (Mahavitaran) वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र (Transformer) जळतात. मागील ७० दिवसांत पुणे जिल्ह्यात ३२७० रोहित्र जळाले होते.

त्यातील ३२४० रोहित्र महावितरणने तातडीने बदलले असून, आता केवळ ३० रोहित्र बदलणे बाकी आहे.

बारामती परिमंडळाच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पारदर्शकता आणत शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावली आहे. महावितरणच्या या कारभारात पारदर्शकता आणली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बारामती परिमंडळात पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र आहे. सध्या थंडी कमी होत असून उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आहेत. त्यातच पाण्याची मागणी आणि वीजपुरवठा यात समतोल साधता सावता महावितरणच्या अधिकाऱ्यांची दमछाक होत असते. बऱ्याचवेळा रोहित्रावर ताण आल्यानंतर बिघाड निर्माण होतो.

त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पाणी व्यवस्थापनावर होतो. महावितरणकडून यावेळी रोहित्र बदलाच्या कामात पारदर्शकता आणली आहे. त्यासाठी परिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Electricity
Agriculture Electricity : शेतीपंपाच्या प्रलंबित जोडण्या मार्चअखेर पर्यंत द्या

रोहित्र तातडीने बदलता यावे, यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच कंपनीच्या कंट्रोल रूमला फोन करण्याची सुविधा असल्याने महावितरणतर्फे तत्काळ उपाययोजना राबविल्या जात आहेत. बारामती परिमंडळ कार्यालयांतर्गत महावितरणची सातारा, सोलापूर व बारामती असे तीन मंडल कार्यालये आहेत.

सोलापूर परिमंडळांत ५५१०४, सातारा ३०६१७ व बारामती परिमंडळांत ३९२२५ रोहित्र आहेत. सरासरी ७.४४ टक्के रोहित्र वर्षभरात नादुरुस्त होतात. अनधिकृत वीज भार, कॅपॅसिटरचा वापर टाळणे ही रोहित्र जळण्याचे प्रमुख कारणे आहेत. रब्बीत हंगामात सर्वाधिक रोहित्र जळतात.

Electricity
Agriculture Electricity : शेतीसाठी दिवसा वीज न दिल्यास आंदोलन करणार

गेल्या डिसेंबरपासून फेब्रुवारीच्या ८ तारखेपर्यंत (७० दिवसांत) परिमंडळात सोलापूर १६६३, सातारा ५७६ तर बारामती परिमंडळात १०३१ अशी एकूण ३२७० रोहित्र जळाली आहेत. यातील केवळ ३० रोहित्र बदलणे बाकी आहे.

जळालेले रोहित्र तातडीने बदलण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, रोहित्र जळताच शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या दैनंदिन नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) फोन करावा.

जेणेकरून ती रोहित्र तातडीने बदलणे शक्य होईल. नियंत्रण कक्षाचे क्रमांक सोलापूरसाठी ९०२९१४०४५५, सातारा ९०२९१६८५५४ व बारामती करिता ७८७५७६८०७४ असे आहेत. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी फोन केल्यास रोहित्र बदलण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कॅपॅसिटरचा वापर करणे किफायतशीर

रोहित्र व कृषिपंप वाचवायचे असतील, तर कॅपॅसिटरचा वापर करणे हा किफायतशीर उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषिपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होऊन गैरसोयही टळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com