Farmer Suicide : परभणी जिल्ह्यात चार वर्षांत ३०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे परभणी जिल्ह्यात २०१९ ते २०२२ या चार वर्षांत ३०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन यात्रा संपविली आहे, अशी माहिती मिळाली.
Farmer Suicide
Farmer SuicideAgrowon

परभणी ः नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) झालेली नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे परभणी जिल्ह्यात २०१९ ते २०२२ या चार वर्षांत ३०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) करून जीवन यात्रा संपविली आहे, अशी माहिती मिळाली.

Farmer Suicide
Farmer Suicide : पंधरा तासाला एक शेतकरी आत्महत्या

जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षात ७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात जानेवारी, फेब्रुवारी, मे, ऑक्टोबर महिन्यांत प्रत्येकी ५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

मार्च, एप्रिल महिन्यांत प्रत्येकी ६, जुलै, ऑगस्ट महिन्यांत प्रत्येकी ८, सप्टेंबर महिन्यात ३, नोव्हेंबरमध्ये ७, डिसेंबर महिन्यात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ५७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली तर १० प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. अद्याप १० प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे.

Farmer Suicide
Farmer Suicide : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना लवकरच मदत

परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दशकांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक संकटांमुळे झालेली नापिकी, कर्ज वसुलीसाठी बँकांनी लावलेला तगादा त्यामुळे चिंतित होऊन आलेल्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. दरम्यानच्या काळात कर्जमाफी करण्यात आली.

परंतु त्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या दिसत नाहीत. जिल्ह्यात २००६ ते २०२२ या १७ वर्षांत ९३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१९ ते २०२२ या चार वर्षांत एकूण ३०९ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी २२५ प्रकरणे मदतीसाठी पात्र, तर ७३ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली आहेत.

वर्षेनिहाय शेतकरी आत्महत्या स्थिती

वर्षे एकूण शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र अपात्र

२०१९ ८५ ५४ ३१

२०२० ६४ ४९ १५

२०२१ ८३ ६५ १८

२०२२ ७७ ५७ १०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com