Diwali market : रत्नागिरीत दिवाळीत २५ लाखांची उलाढाल

फराळासह आकाशकंदील, मातीच्या पणत्या, दिवाळी साहित्य विक्रीतून महिला बचत गटांनी दिवाळीत सुमारे २५ लाखांहून अधिक आर्थिक उलाढाल केल्याचा अंदाज वर्तविला आहे.
Diwali market
Diwali market Agrowon

रत्नागिरी ः फराळासह आकाशकंदील, मातीच्या पणत्या, दिवाळी (diwali) साहित्य विक्रीतून महिला बचत गटांनी (Women's self-help group) दिवाळीत सुमारे २५ लाखांहून अधिक आर्थिक उलाढाल केल्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बाजारपेठांतील ठिकाणांसह मुंबई व पुण्यामध्येही बचत गटांचा फराळ पोहोचला. कोरोनानंतर बचत गटांच्या अर्थकारणाला दिशा मिळत असून

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) गटांनी भरारी घेतली आहे.जिल्ह्यात सुमारे चौदा हजार बचत गट आहेत. यंदा कोरोना पश्‍चात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी झाली. दिवाळीमध्ये ग्रामीण भागात महिला बचत गटांकडून आलेल्या फराळाला मोठी मागणी होती.

या सणाचा व्यावसायिक फायदा मिळवण्यात ‘उमेद’च्या महिला बचत गटांना यश आले. ‘उमेद’मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विविध शासकीय कार्यालये, गावागावांतील मुख्य बाजारपेठांमध्ये बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले होते. शंभरहून अधिक ठिकाणी अशी व्यवस्था केली गेली.

याचबरोबर मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागातून बचत गटातील महिलांच्या वैयक्तिक संपर्कामधूनही फराळाची मागणी आली होती. दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यंत मागणीनुसार फराळ पोहोचता करण्यात आला.

Diwali market
Kharif Crop Harvesting : खरीप पिकांच्या काढणी, मळणीची कामे वेगात

दिवाळी फराळाबरोबरच आकाशकंदील, आकर्षक पणत्या, प्रकाश व्यवस्थेचे साहित्य, सुशोभीकरणासाठी आवश्यक कागदी पताका तयार करून त्याची अनेकांनी विक्री केली. दोन वर्षांपूर्वी दिवाळीत १७ लाखांची उलाढाल झाली होती. यावर्षी नियोजनबद्ध कामामुळे आठ लाखांची भर पडली असून सुमारे पंचवीस लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे

दरम्यान, दिवाळीत बचत गटांना विक्रीसाठी पर्याय उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्यासह ‘उमेद’च्या प्रकल्प संचालक श्रीमती एन. बी. घाणेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे यांनी दिवाळीपूर्वीच नियोजन केले होते. त्याची अंमलबजावणी तालुकास्तरावरही प्रत्यक्षात केल्यामुळे महिलांना बाजारपेठ मिळाली.

‘उमेद’च्या स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न यंदा केले होते. योग्य नियोजन केल्यामुळे विक्रीही चांगली झाली. उमेदने महिलांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली.- प्रणिता बारगुडे, कुलस्वामीनी बचत गट

Diwali market
Crop Insurance : पीकविम्याचा परतावा नाहीच; शेतकरी संतप्त

ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी ठिकाणी निवडून स्टॉलला जागा देण्यात आली होती. त्याचा फायदा बचत गटांनाही झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकचा फराळ विक्रीला गेला आहे.- अमोल काटकर, उमेद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com