Chimani : चिऊसाठी बांधली २२५ घरटी

वरोऱ्याच्या यादव यांचे पक्षीप्रेम
Chimani
Chimani Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
चंद्रपूर ः चिऊ ये दाणा खा पाणी पी आणि भुर्रर उडून जा ! आजी, आजोबांनी चिमुकल्यांना कडेवर घेऊन ही गोष्ट सांगितल्याचे प्रत्येकालाच माहिती आहे. जागतिक चिमणी दिनाला (International Sprow Day) चिमण्यांची आठवण अनेकांनी भाषणातून काढली.

मात्र आनंदवन येथील एका पक्षी प्रेमीने प्रत्यक्ष कृतीद्वारे चिमण्यांचा अधिवास राखण्याकरिता पुढाकार घेतला आहे. त्याकरिता त्याने तब्बल २२५ घरटी बनविली असून त्यांच्या खाण्यापिण्यावरही विशेष लक्ष तो देतो.

वातावरणातील बदलांचा अनपेक्षीत परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर झाला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे घरटी बनविण्यासाठी लागणारा विशिष्ट काडीकचरा तसेच कापूस व इतर साहित्यच पक्ष्यांना मिळत नाही.

परिणामी शहरी भागात पक्षी सिमेंट पोत्यांच्या तंतूंचा वापर घरट्यांसाठी करीत असल्याचे निरीक्षण अकोल्यातील पक्षीप्रेमी दीपक जोशी यांनी नोंदविले होते.

मात्र पक्ष्यांप्रती असलेल्या विशेष प्रेमातून वरोरा येथील शिवशंकर सरोजीत यादव यांनी आपल्या घराच्या परिसरात तब्बल २२५ मनमोहक घरटी तयार केली आहेत. =

Chimani
Vijay Din : विजय दिनानिमित्त योध्यांना आदरांजली

लाकडापासून हे घर तयार करण्यासाठी ४५० रुपयांचा खर्च आला. पक्ष्यांची निवास व्यवस्था करण्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. तर त्यांनी या घरट्यांत अधिवास शोधणऱ्या पक्ष्यांकरिता खाण्याची सोयदेखील केली आहे. दररोज तीन किलो तांदूळ या पक्ष्यांना दिला जातो.

पावसाळ्यात हे प्रमाण वाढवून १२ किलो केले जाते. वर्षभर १२० ब्रेडही खाण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. त्यांच्या अंगणात, छतावर अशाप्रकारचे पक्षी खाद्यान्न दिसून येते. रोज सकाळी उठल्यावर पक्ष्यांकरिता असलेल्या पात्रातील पाणी बदलले जाते.

या सेवाकार्यात कोणताच खंड यादव कुटुंबीय पडू देत नाहीत. त्यामुळे त्यांचा हा मुक्‍या पक्ष्यांप्रतीचा सेवाभाव परिसरात कुतुहलाचा विषय ठरला आहे.

विशेष म्हणजे शिवशंकर हे एका खासगी कंपनीत काम करतात. ही कंपनी सध्या बंद पडली असून कामगारांना अर्धा पगार दिला जातो.

मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी हे सेवाकार्य सुरू ठेवले आहे.

शहरीकरणामुळे पक्षी लोप पावत असल्याची स्थिती आहे. पर्यावरण रक्षणात त्यांचे मोठे योगदान राहते. परिणामी त्यांचे अस्तित्व राखले जावे याकरिता २२५ लाकडी घरट्यांची संकल्पना साकारली आहे. त्यांच्या किलबिलाटामुळे वेगळाच आनंद मिळतो.

- शिवशंकर यादव, यशोदानगर, वरोरा, चंद्रपूर. मो.9822775189

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com