Agriculture Electricity : कृषिपंप ग्राहकांकडे २१३ कोटींची थकबाकी

या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणने जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली असून, थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
Agricultural pump electricity bill
Agricultural pump electricity bill Agrowon
Published on
Updated on

Agriculture Electricity News सांगली : जिल्ह्यातील ८२ हजार ७५२ कृषिपंप (Agriculture Pump) ग्राहकांकडे २१३ कोटी ३९ लाख तीन हजार रुपये थकबाकी (Electricity Arrears) आहे. या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणने (Mahavitaran) जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली असून, थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार कृषी ग्राहकांकडे १०१६ कोटी रुपये थकबाकी आहे. तसेच चालू वीज बिलांचे ५५५ कोटी रुपये थकीत आहेत.

यापैकी पाच ते दहा वर्षे थकबाकी कृषी ग्राहकांची संख्या ६२ हजार २०४ असून, त्यांच्याकडे १५६ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपये आहेत. तसेच १७ हजार ४०२ कृषी ग्राहक १० ते १५ वर्षांपासून थकबाकीदार आहेत.

Agricultural pump electricity bill
Agriculture Electricity : सातारा जिल्ह्यातील कृषिपंपाची थकबाकी हजार कोटी रुपयांवर

या ग्राहकांकडे ४७ कोटी ४८ लाख सात हजार रुपयांची थकबाकी आहे. तसेच १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत थकबाकीदार कृषी ग्राहकांची तीन हजार १४६ ग्राहक असून, त्यांच्याकडे नऊ कोटी ३५ लाख १५ हजार रुपयांची थकबाकी आहे. या कृषी ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Agricultural pump electricity bill
Agriculture Pumps : कृषिपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्यांसाठी मार्चची डेडलाइन

आकडे टाकणाऱ्यांचे जागेवर नियमित कनेक्शन

ग्रामीण भागातील शेतकरी वीज कनेक्शनसाठी अर्ज करून थकल्यानंतरही महावितरणकडून विद्युत कनेक्शन मिळाले नाही.

त्यामुळे या शेतकऱ्यांनी जवळच्या विद्युत तारेवर आकडे टाकून कृषिपंप चालू केले होते

या कृषी ग्राहकांना महावितरणने दिलासा दिला असून, जागेवरच त्यांना विद्युत कनेक्शन देण्याची भूमिका महावितरणने घेतली आहे.

पाच वर्षांवरील थकीत कृषी ग्राहक

विभाग ग्राहक संख्या थकीत रक्कम

इस्लामपूर १०२०४ १८.२७ कोटी

कवठे महांकाळ २८३६३ ८४.४८ कोटी

सांगली ग्रामीण १७७३६ ३९.२४ कोटी

सांगली शहरी ४५३ १.१२ कोटी

विटा २५९९६ ७०.२५ कोटी

एकूण ८२७५२ २१३.३९ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com