Chandoli Dam : म्हैसाळ योजनेसाठी चांदोली धरणातून २ टीएमसी पाणी सोडणार

Sangli Latest Dam Updates : सांगली जिल्ह्यातील दुष्काळीग्रस्त जत तालुक्यातील गावांसाठी चांदोली धरणातून २ टीएमसी पाणी सोडण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे.
Chandoli Dam
Chandoli DamAgrowon
Published on: 
Updated on: 

Sangli Dam News : मान्सूनच्या पावसाने सांगली जिल्ह्यात ओढ दिल्याने जतमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणातून २ टीएमसी पाणी म्हैसाळ योजनेतून देण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विस्तारीत म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

धरणातून हे पाणी येत्या काही दिवसात म्हैसाळ योजनेतून सोडण्यात येणार असून दोन महिन्यात या पाण्याचा वापर करायचा आहे.

Chandoli Dam
Water Agreement : कर्नाटकचे पाणी जतला देऊ पण... ; डी. के. शिवकुमारांची महाराष्ट्रासोबत कराराची तयारी

जतमधील अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागत आहेत. तसेच जनावराच्या चारा-पाण्याचा प्रश्‍नही गंभीर बनत चालला आहे. अशा स्थितीत लोकांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. पण कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान कमी असल्याने नदीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी नाही. अशा स्थितीमध्ये अधिक काळ सिंचन योजना चालू करता येत नाहीत.

सध्या वारणा नदीवरील चांदोली धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा फक्त ७ टीएमसी असून त्यातील काही पाणी जत सारख्या दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी देण्याचे आदेश जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास देण्यात आले आहे. चांदोली धरणातील २ टीएमसी पाणी २ महिन्यासाठी टंचाई कालावधीत सोडण्यात येणार आहे, असे खा. पाटील यांनी सांगितले. यावेळी आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, माजी सभापती दिग्विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.