Grampanchayat Election : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचे बिगुल, ५ नोव्हेंबरला मतदान

Election Commision : राज्यातील मुदत संपलेल्या दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
Grampanchayat Election Ahmednagar
Grampanchayat Election AhmednagarAgrowon
Published on
Updated on

Gram Panchayat Program 2023 : राज्यातील मुदत संपलेल्या दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता. ३) जाहीर केला. या निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

Grampanchayat Election Ahmednagar
Crop Damage Compensation : चौदा लाख शेतकऱ्यांना एक हजार कोटींची मदत

इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण, प्रभाग रचना यामुळे महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. या निवडणुका कधी जाहीर होतील, याकडे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे डोळे लागले असताना राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी ३४ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीत ग्रामपंचायतींच्या तीन हजार ८० रिक्तपदासांठी देखील मतदान घेण्यात येईल. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. २५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com