Jalyukta Shivar Abhiyan : जलयुक्त अभियानासाठी १८७ गावाची निवड

जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी
Jalyukta Shivar Abhiyan
Jalyukta Shivar Abhiyanagrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : ‘जलयुक्त शिवार अभियान’ (Jalyukta Shivar Abhiyan) दोन अंतर्गत पुणे जिल्ह्यातील १८७ गावांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.

या अभियानांतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामात शासकीय यंत्रणेने लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच अशासकीय तसेच खासगी संस्थांचाही योग्य सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत गाव निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांच्या समवेत जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समितीतील सदस्य उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Jalyukta Shivar Abhiyan
Jalyukta Shivar Scheme : ‘जलयुक्त’च्या दुसऱ्या टप्‍प्यात १३१ गावे

डॉ. देशमुख म्हणाले की, गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे तयार करावा. अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी करून पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करावा. हे अभियान जिल्ह्यात मोहीम स्तरावर राबवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Jalyukta Shivar Abhiyan
Jalyukt Shiwar : जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

जलयुक्त अभियानासाठी निवडलेली १८७ गावे :

तालुका -- गावांची संख्या -- गावे

हवेली -- १७ - जांभळी, खेड, कोलवाडी, रामोशीवाडी, मांजरी खु., मांडवी बु., माणेखडी, मोगरवाडी, मोकरवाडी, शिवापूर, वांजळेवाडी, आर्वी तानाजीनगर, आगळंबे, कल्याण, खामगांव मावळ, घेरासिंहगड, खडेवाडी.

शिरूर -- १७ - चौधरवाडी (केंदूर), झगडेवाडी, महादेववाडी, माळवाडी आगरकरवाडी, पऱ्हाडवाडी, सुक्रेवाडी, मुखई, जातेगांव बु., पाबळ, खैरेनगर, धामारी, कान्हुर मेसाई, मिडगुलवाडी, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, सविंदणे, थोरातवाडी (मलठण)

खेड -- २० -- गोलेगांव, कासारी, कोहिंडे खु., परसूल, वाळद, वेव्हावळे, वाघू, येनिये खु., भोसे, वाफगांव, जऊळके बु., चिंचबाईवाडी, वरूडे, गाडकवाडी, कन्हेरसर, पूर, गोसासी, गुळाणी, वाकळवाडी, चौधरवाडी.

मावळ -- १३ -- बेलज, नाणे, नानोली ना.मा, कुसगांव प.मा, जांभुळ, बेडसे, शिवाली, ओझर्डे, शिळींब, साते, इंगळुन, पिंपरी, डाहुली

जुन्नर -- १२ -- बुचकेवाडी, धोलवड, डिंगोरे, डुंबरवाडी, घंगाळदरे, कुसुर, मालवाडी, नेतवाडी, उंब्रज, शिंदे, शिवली, धालेवाडी तर्फे मिन्हेर

आंबेगाव -- १३ -- आपटी, कळंबई, कोंढवळ, गाडेवाडी, तेरुंगण, नानवडे, निमडाळे, मेघोली, मेनुंबरवाडी, वरसावणे, गिरवली, माळीण, काठापूर बुद्रुक

पुरंदर -- १४ -- जाधववाडी, काळेवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पठारवाडी, पवारवाडी, कोडीत ख., राजेवाडी, बांदलवाडी, चिवेवाडी, मिसाळवाडी, नाझरे कडेपठार, ढालेवाडी, सासवड

वेल्हा -- ४ -- अंत्रोली, पाबे, कोदवडी, सोंडे सरफल

मुळशी -- ६ -- कातवडी, मुगावडे, निवे, आंबेगाव, सालतर, चाले

भोर -- ६ -- म्हसर खु., भावेखल अंगसुले, कुरंगवाडी, नायगांव, गोरड म्हसवली, तळे म्हसवली

बारामती -- ३९ -- गुनवडी, मळद, कन्हेरी, डोर्लेवाडी, पिंपळी, ढेकळेवाडी, झारगडवाडी, कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, काटेवाडी, माळेगांव खु., खांडज, निरावागज, मुर्टी, मासाळवाडी, मुढाळे, वढाणे, कुतवळवाडी, आंबी खु., भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, देऊळगांवरसाळ, नारोळी, कोळोली, दंडवाडी, सुपे, लोणीभापकर, काऱ्हाटी, माळवाडी, आंबी बु., पळशी, मोरगाव, तरडोली, अंजनगाव, सोनवडी सुपे

इंदापूर -- ११ -- पिटकेश्वर, निमगांव केतकी, गोतंडी, कळस, शिंदेवाडी, काझड, बोरी, शेळगांव, भरणेवाडी, कडबनवाडी, अंथुर्णे

दौंड -- १५ -- ताम्हणवाडी, खुटबाव, नानगाव, पारगांव, पडवी, भांडगाव, डाळिंब, जिरेगाव, हिंगणीगाडा, वासुंदे, रोटी, कोठडी, मळद, नंदादेवी, बोरीऐदी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com