Chandrapur News : जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून साकारली १५० ग्रामीण वाचनालये

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची संकल्पना
 Rural Libraries Chandrapur News
Rural Libraries Chandrapur NewsAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Chandrapur News : ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला बळ मिळावे या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून १५० वाचनालये उभारण्यात आली आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला ग्रामीण युवकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 Rural Libraries Chandrapur News
Rural Photo : ग्रामीण अर्थव्यवस्थेची पाळंमुळं

डिजिटल क्रांतीच्या या युगात अनेकांना मोबाईलने वेड लावले आहे. त्यामुळे पुस्तकांचे वाचन कमी होत गेले.

मात्र ही संस्कृती टिकणे गरजेचे आहे हा विचार मनात ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून ग्रामग्रंथालय ही अभिनव संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

भविष्यातील संशोधक, वाचक, अधिकारी व आदर्श नागरिक निर्माण व्हावे या प्रमुख उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १० याप्रमाणे १५ तालुक्यांत १५० वाचनालयांची निर्मिती मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

जिल्हा परिषद, पंचायत विभाग व शिक्षण विभाग यांच्या कृतीसंगमातून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

वाचनालय निर्माण करण्याची चळवळ अविरतपणे सुरू राहावी या उद्देशाने जिल्ह्यात १५० वाचनालये सुरू झाली असून पुढील टप्प्यात समाजकल्याण विभागाच्या पुढाकारातून ४५ वाचनालयांची निर्मिती करण्यात येणार आहे.

या वाचनालयाची विशेष बाब म्हणजे, वाचनालयासाठी प्रत्येक गावातील वापरात नसलेल्या शासकीय इमारतींची दुरुस्ती व सुशोभीकरण करून त्यांचे वाचनालय तयार करण्यात आलेले आहे.

पंचायत विभागाच्या माध्यमातून वाचनालयासाठीच्या इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी, कपाट, टेबल खुर्च्या, विजेची सोय, इत्यादी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी जिल्हास्तरावरील १५ वित्त आयोगाच्या

 Rural Libraries Chandrapur News
Rural Development : ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी कशी उभारली लोकचळवळ

निधीच्या माध्यमातून १ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद
करण्यात आली आहे. तसेच वाचनालयात स्पर्धा परीक्षेकरीता लागणारी पुस्तके, अवांतर वाचनाची पुस्तके, लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तके आदीकरीता ३५ लक्ष रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

या वाचनालयात सामाजिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, अधिकारी, स्वयंसेवी संस्था मुलांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

ही वाचनालये शाश्‍वत राहावी, लोकसहभाग वाढवा याकरिता वाचनालयाच्या व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांची समिती तयार करण्यात येणार आहे. वाचनालयाची नियमावली, वेळ, पुस्तकांच्या नोंदी इत्यादी जबा

बदारी विद्यार्थी समितीमार्फत पार पाडली जाईल. गावातील शिक्षक, गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही वाचनालये सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com