

Washim News : जिल्ह्यातील प्रकल्पात साचलेला गाळ काढून पाणीसाठा वाढवणे तसेच या गाळामुळे जमिनीची सुपीकता अधिक प्रमाणात वाढवण्याच्या उद्देशाने राबवल्या जात असलेल्या गाळमुक्त अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार’ या योजनेतून जिल्ह्यातील १४५ तलावांतून १५ लाख ९ हजार ३१२ घनमीटर गाळ काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या ९२८ हेक्टरवर हा गाळ टाकण्यात आल्याने उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठवण तयार होणार आहे.
दिवसेंदिवस शेतीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीची सुपीकता कमी होत आहे. पारंपरिक पाणीसाठे असलेल्या तलाव व धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादकता टिकविण्यासोबतच ती वाढविण्यासाठी सोबतच या पारंपरिक पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान सुरू आहे.
जिल्ह्यात २६ जूनपर्यंत नीती आयोगाच्या माध्यमातून ७९ लहान-मोठ्या तलावातून सहा लाख ७२ हजार ७८४ घनमीटर गाळ काढण्यात आला. ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेतून २५ कामे पूर्ण करण्यात आली.
यामधून सहा लाख ६६ हजार ४९७ घनमीटर गाळ काढण्यात आला. शेतकऱ्यांनी २१ तलावांतून लोकसहभाग व स्वखर्चाने ५६ हजार ७९३ घनमीटर गाळ उचलून आपल्या शेतात टाकला. ही कामे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून करण्यात आली आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून ९ मोठ्या तलावातील ८९ हजार १२० घनमीटर गाळ काढून लाभधारक शेतकऱ्यांनी शेतात पसरविला. लोकसहभाग/ स्वखर्चाने ११ तलावांतून २४ हजार ११८ घनमीटर गाळ काढला.
राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग आणि जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने ‘गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार’ योजना आणि नीती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४५ तलावातील १५ लाख घनमीटरपेक्षा जास्त गाळ काढून शेतात पसरविल्यामुळे या शेतीचे उत्पन्न तर वाढणार आहे.
ज्या तलावातून गाळ काढण्यात आला आहे, त्या तलावात एक अब्ज ५० कोटी ९३ लाख लिटरपेक्षा जास्त पाणी साठणार असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्याचे पर्जन्यमान कमी असल्यामुळे आणि जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू पद्धतीने शेती करीत असल्यामुळे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न शेतात गाळ टाकल्यामुळे वाढीस चालना मिळेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.