Red chilli : कळमनामध्ये वाळलेल्या मिरचीची लाली गडद ; क्विंटलला १२ ते १६ हजार रुपये दर

Red chilli Rate : कळमना बाजार समितीत गेल्या महिन्यात हिरव्या मिरचीचे दर वाढले. १२ ते १६ हजार रुपये प्रतिक्‍विंटलने तिचे व्यवहार होत आहेत, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
red pepper
red pepper Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : कळमना बाजार समितीत गेल्या महिन्यात हिरव्या मिरचीचे दर वाढले होते. आता पुन्हा हिरव्या मिरचीच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. त्यासोबतच सुकी (वाळलेली) मिरची देखील तेजीत असून १२ ते १६ हजार रुपये प्रतिक्‍विंटलने तिचे व्यवहार होत आहेत, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

red pepper
Red Chilli Market: लाल मिरची उत्पादनात घट; मागणी मात्र वाढली |Agrowon| ॲग्रोवन

कळमना बाजार समितीत हिरवी, वाळलेली (लाल) तसेच ढोबळी मिरची या तीनही प्रकारच्या मिरचीची आवक बारमाही होते. व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात हिरवी मिरची तेजीत होती. त्यानंतर या मिरचीचे दर ३००० ते ३५०० आणि २४ ऑगस्ट रोजी २५०० ते २८०० रुपये क्‍विंटलवर होते. दरात अशाप्रकारे घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता पुन्हा हिरव्या मिरचीच्या बाजारात तेजीचे वातावरण आहे. ६००० ते ९००० रुपये क्‍विंटलने या मिरचीचे व्यवहार शुक्रवारी (ता.२६) झाले. यापुढे काही दिवस हाच दर मिरचीला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

red pepper
Chili Production : मिरची उत्पादनात सातत्य ठेवण्याची गरज

कळमना बाजारात वाळलेल्या (सुकी) मिरचीचा बाजार स्थिर आहे. सरासरी १२ ते १६ हजार रुपये क्‍विंटलचा दर याला मिळत असल्याचे सांगण्यात आले. वाळलेल्या मिरचीची आवक नागपूर, भंडारा या जिल्ह्यातून होते. नागपूरच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशातील काही गावातून देखील मिरची कळमना बाजारात येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मिरचीच्या दरासोबत आवक ८०० क्‍विंटल इतकी स्थिर आहे.

हिरव्या मिरचीच्या दरांतही सुधारणा

हिरव्या मिरचीची आवक ३२० क्‍विंटलवर होती. शुक्रवारनंतर (ता.२५) मात्र ती कमी होऊन सहा क्‍विंटलवर आली. परिणामी देखील दर वाढण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले जाते. बाजारात ढोबळी मिरचीच्या आवकेत देखील सातत्य आहे. तिची रोजची सरासरी आवक २५० क्‍विंटलच्या घरात आहे. या मिरचीचे दर २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com