Maharashtra Soybean Sowing : राज्यात यंदा सर्वाधिक सोयाबीनच्या पेरण्या तर कापसाचीही बाजी, पावसाची टक्केवारीही आली समोर

Rain Statistics Maharashtra : सरकारकडून राज्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी जाहीर केली. यामध्ये १०४ टक्के पाऊस झाल्याचे समोर आले.
Maharashtra Soybean Sowing
Maharashtra Soybean SowingAgrowon

Maharashtra News : राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने ज्या भागात रेड अलर्ट दिला आहे त्या भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान सरकारकडून राज्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी जाहीर केली.

यामध्ये १०४ टक्के पाऊस झाल्याचे समोर आले. १७८ तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यांत ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. यामध्ये यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा या भागात खरिपाच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्यात.

तर सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली, कोल्हापूर या भागात पेरणीचे प्रमाण कमी आहे. राज्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

१११ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर कापसाची ९६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केल्याची माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. १२०.६८ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते.

Maharashtra Soybean Sowing
Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंडच्या दरात चांगली वाढ

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com