Dhananjay Munde : आता आवश्यक खतांसाठीही १०० टक्के अनुदान, कृषीमंत्र्यांची माहिती

Orchard planting scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना' अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Dhananjay Munde
Dhananjay Mundeagrowon
Published on
Updated on

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या 'स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना' अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

फळबाग लागवडअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही कृषीमंत्री मुंडे यांनी दिली.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटरद्वारे धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde : शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कृषिमंत्र्यांशी शाब्दिक वाद

राज्य सरकारने ६ जुलै, २०१८ रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यातंर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन १०० टक्के अनुदान देते.

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com