गणेश दूध संस्थेतर्फे सभासदांना १० टक्के लाभांश
आळेफाटा, ता.जुन्नर ः गणेश दूध संस्थेच्या (Milk Society) (राजुरी) वतीने सभासदांना १० टक्के लाभांश व प्रति लिटर १ रुपया बोनस जाहीर करण्यात आला आहे. संस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब यशवंत हाडवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी, उपसरपंच माऊली शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे, माजी अध्यक्ष गोविंद औटी संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ, दूध उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.
संस्थेने सभासदांसाठी माफक दरात किराणा, मेडिकल, पशुखाद्य विभाग चालू असून राजुरी दुग्धजन्य पदार्थ केंद्र चालू केलेले आहे. संस्थेला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सहकारी उत्कृष्टता पुरस्कार २००४ मिळालेला आहे. आदर्श दूध संस्था पुरस्कार २००६, तसेच राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदर्श दूध संस्था सहकार भूषण पुरस्कार २०१७, सहकारी सर्वउत्कृष्टता पुरस्कार २०२१ आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अहवाल वाचन संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे यांनी केले.
यावेळी वर्षभरात सर्वाधिक दूध घालणाऱ्या शेतकरी सभासदांचा सत्कार करण्यात आला. नाव आणि दूध संकलन (कंसात) - शिवाजी औटी (७३ हजार २९०), दत्तात्रेय डुंबरे (५५ हजार ३७०), निवृत्ती औटी (५१ हजार ०९८), किशोर औटी (४३ हजार ९९३), राजाराम औटी (४२ हजार ७२३) या शेतकऱ्यांनी सर्वांत जास्त गाईचे दूध घातले. तर, तृप्ती औटी (३६ हजार ४८१), रंजना औटी (१७ हजार ९०३), बाळासाहेब औटी (९ हजार ८३३), इंदूबाई हाडवळे (९ हजार ०५३), गणेश नायकवडी (८ हजार ९७३) यांनी सर्वाधिक म्हशीचे दूध घातल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.