नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यांतील काही गावे भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून विविध भाजीपाला पिकांमध्ये सातत्य जपले आहे. वर्षभर विविध पिकांचे लागवडीचे नियोजन तयार करून त्यातून ताजे उत्पन्न मिळवून अर्थकारणही उंचावले आहे..नांदेड या मुख्य जिल्हा ठिकाणापासून पंचवीस ते तीस किलोमीटरवर मुदखेड तालुक्यातीलकाही गावे भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. यातील रोहीपिंपळगाव हद्दीत वसंतवाडी, शंकरनगर, आनंदवाडी आदींचा शिवार येतो. पश्चिमेला गोदावरी नदी असल्यामुळे पाण्याची वानवा नाही. हा भाग टोमॅटो, फ्लॉवर. कोबी, वांगी, काकडी आदी भाजीपाला पिकांचा ‘हब’ मानला जातो. या परिसरात सुमारे एक हजार ९८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते..Vegetable Farming Success: वांगी, मुळा, भाजी; अवघी विठाई तिची !.येथून दररोज आठ ते १० गाड्या नांदेड, निजामाबाद बाजारपेठेत विक्रीसाठी जातात. रोहीपिंपळगाव परिसरातील शेतकरी प्रामुख्याने ऊस, हळद ही बागायती पिके घेतात. परंतु या पिकांपासून उत्पादन येण्यासाठी किमान सव्वा वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे ताजे उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत. यातही टोमॅटोचे पीक सर्वाधिक शेतकरी घेतात. त्यामुळे हे शेतकरी या पिकांमध्ये मास्टर झाले आहेत..ग्रामविकासात रोहीपिंपळगाव आघाडीवरजिल्हा परिषद गट असलेल्या रोहीपिंपळगावची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे. ग्रामपंचायत ११ सदस्यांची आहे. या गावालगत असलेल्या नाल्यावर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, सिमेंट बंधारा, शेतकऱ्यांच्या शेतात ढाळीचे बांध अशी जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यामुळे बारमाही पाण्याची सोय झाली आहे. बालाजी भूंजगा शिंदे हे सरपंच आहेत. गावात ग्रामविकासा कामेही मोठ्या प्रमाणात झाली आहेत. ग्रामस्वच्छता अभियानात गावाने लक्षणीय काम केले आहे. सार्वजनिक शौचालय, पक्के रस्ते, नळयोजना, दुतर्फा वृक्ष लागवड, सांडपाणी व्यवस्थापन, दोन समाज मंदिरे, ग्रामपंचायत इमारत आदी कामांत गावाने भरारी घेतली आहे. यासोबतच गावाच्या मुख्य भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लक्ष वेधून घेतो. राष्ट्रसंत गाडगेबाबा, संत तुकडोजी बाबा सभागृह गावाच्या मुख्य ठिकाणी आहे. पुरातन दत्त मंदिर, हनुमान मंदिर आदी स्थळेही गावच्या सौंदर्यात भर घालतात..Vegetable Farming: दोडका उत्पादनात गुणवत्ता, दर्जा राखण्यावर भर .एक हजार एकरांत भाजीपालावसंतवाडी, आनंदनगर, शंकरनगर व रोहीपिंपळगाव आदी मिळून शिवारात दरवर्षी आठशे ते एक हजार एकरांत भाजीपाला पिके घेतली जातात. यात टोमॅटो सुमारे अडीचशे ते तीनशे एकर, कोबी तीनशे एकर, वेलवर्गीय भाजीपाल्यांमध्ये काकडी, दोडकी, कारली दीडशे ते दोनशे एकर, वांगी, मिरची, फ्लॉवर, पालेभाज्या दोनशे एकरांच्या दरम्यान असे क्षेत्र असल्याचे वसंतवाडीचे प्रयोगशील शेतकरी सुनील शिंदे सांगतात. वीस वर्षांपासून भाजीपाला शेतीत शेतकऱ्यांचे सातत्य आहे..क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने रोपांची आवश्यकता लक्षात घेऊन शिंदे यांनी एक एकरांत हायटेक भाजीपाला रोपवाटिका सुरू केली आहे. वर्षभर शेतकऱ्यांना लागणारी भाजीपाला रोपे ते तयार करून देतात. येथे वर्षभर सात ते आठ महिला काम करतात. त्यातून त्यांना शाश्वत रोजगार तयार झाला आहे. भाजीपाला पिकांसोबतच झेंडूचीही रोपेही तयार केली जातात. काशिनाथ संभाजी शिंदे, भीमराव आनंदराव शिंदे आदी अनेक शेतकऱ्यांनी हंगाम, बाजारभाव यांचा अभ्यास करून वर्षभराचे पिकांचे नियोजन केले आहे..Vegetable Farming : गौरीपूजनासाठीच्या वनस्पतींची शेती अन् सेवाही.दररोज नांदेड, तेलंगण येथील निजामाबाद बाजार यासह स्थानिक आठवडे बाजारातही ते विक्री करतात. या पीक व्यवस्थेतून शेतकऱ्यांनी अर्थकारण सुधारले आहे. शहराला शोभतील अशी घरे त्यांनी बांधली आहेत.भीमराव आनंदराव शिंदे यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी टोमॅटोमध्ये फ्लॉवर किंवा अन्य आंतरपिके घेण्याचे प्रयोग केले आहेत. त्यांचा बीए द्वितीय वर्षात शिकत असलेला मुलगा रुकमाजी शिंदे हा देखील शिक्षण सांभाळून शेतीत मदत करतो. शिंदे दरवर्षी दीड एकरांत टोमॅटोची वर्षातून तीन वेळा लागवड करतात. .एका हंगामात दर साधले नाहीत किंवा हवामानाने फटका दिल्यास दुसऱ्या हंगामातून नुकसान भरून काढण्याची संधी मिळते. अशा रीतीने जोखीम कमी केली जाते. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जूनमध्ये लागवड केलेल्या टोमॅटोचे मोठ्या प्रमाणातच नुकसान झाले. दरांवर त्याचा प्रभाव दिसून आला. या काळात टोमॅटो प्रति क्रेट चारशे ते पाचशे रुपये दराने विकावे लागले. तीन टप्प्यांपैकी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत टोमॅटोची लागवड करण्यात येते..Vegetable Farming: पालेभाज्यांमधून मिळविले बारमाही उत्पन्न.शिंदे यांची नैसर्गिक शेतीरोहीपिंपळगाव येथील राम नागोराव शिंदे यांनी तीन- चार वर्षांपासून नैसर्गिक शेतीवर भर दिला आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा ते स्वतः शेतावरच तयार करतात. सध्या त्यांच्या शेतात नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली हळद तीस गुंठे, आले वीस गुंठे, टोमॅटो पंधरा गुंठे असे क्षेत्र आहे. टोमॅटो व वांग्याचे विविध वाण त्यांनी लावले आहेत. पपई, चवळी, भेंडी, लसूण, कांदा, गाजर, बीट, मुळा, बटाटा, मेथी, कोथिंबीर, संकेश्वरी मिरची, पालक अशी विविधता जपली आहे.नांदेड शहरातील चिखलवाडी भागात बुधवारी आणि रविवारी ते विक्री करतात. सेंद्रिय मालाला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांकडून शेतकरी उत्पादकांच्या व्हॉटस ॲप ग्रुपवर भाजीपाल्याची मागणी नोंदवली जाते. त्यानुसार तो उपलब्ध करून देण्यात येतो. नैसर्गिक- सेंद्रिय म्हणून त्यास अधिक दर मिळतो..भाजीपाला पिकांनी केले शाश्वतवसंतवाडीचे सुनील शिंदे पूर्वी दुग्ध व्यवसायात होते. मात्र पुढे त्यांनी हा व्यवसाय कमी करून भाजीपाला शेतीवर अधिक लक्ष केंद्रित केले. दोन- तीन एकरांत ते वर्षभर विविध भाजीपाला घेतात. पूर्वी वर्षाला जिथे एकूण चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळायचे तेथे आज दहा ते पंधरा लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागल्याचे ते सांगतात. पूर्वी चार-पाच एकरच सिंचित तर सात एकरांपर्यंतचे क्षेत्र कोरडवाहू होते. आता भाजीपाला पिकांमधून आर्थिक उत्पन्न वाढल्यानंतर त्यांनी बोअर घेतले. .सिंचन व्यवस्थापन करून सर्व शेती बागायती केली. घर बांधले. मुलांना चांगले शिक्षण देता येत आहे. भाजीपाला शेतीतूनच शिवम या मुलाला बायोटेक्नॉलॉजी विषयातील तर अजय यास होमिओपॅथीचे शिक्षण देता आले. नांदेडसारख्या शहरात खासगी ट्यूशनचे शुल्क परवडण्याजोगे नसते. मात्र शेतीतील उत्पन्नातून आता घरातील मुलांना या ट्यूशनचा लाभ देणेही शक्य झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यांचे वीस ते बावीस जणांचे मोठे कुटुंब आहे. शेतीतूनच घराला आर्थिक स्थैर्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.सुनील शिंदे ७७०९०८८४३५राम शिंदे ९५४५७४९८४१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.