Women Farmer Success: चावलखेडा (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथील उज्ज्वला नामदेव पाटील यांनी कोरडवाहू शेतीला म्हैसपालनाची जोड दिली आहे. जातिवंत दुधाळ म्हशींचे संगोपन, काटकसरीने शेती तसेच पशुपालनातील खर्चावर त्यांनी नियंत्रण ठेवले आहे. अडचणी असल्या तरी त्यांनी शेती आणि पशुपालनातील प्रगतीचा दृष्टिकोन कायम ठेवला आहे.