राजकुमार चौगुलेMaharashtra Smart Farming: कोल्हापूर जिल्ह्यातील चिंचवडे (ता. करवीर) येथील प्रकाश, दिलीप, व संजय या तीन पाटील बंधूंनी आपली शेती आणि घर एकत्र टिकविण्याची संस्कृती व परंपरा जपली आहे. आठ एकर शेतीत ऊस हे मुख्य पीक आहे. मात्र केवळ उसापुरते मर्यादित न राहता मार्केटचा अभ्यास करून ऊस- कलिंगड- मिरची व झेंडू अशी अत्यंत हुशारीने चक्राकार पद्धती राबवून उत्पन्नाचा बारमाही ताजा स्रोत कुटुंबाने तयार केला आहे. .कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा रस्त्यावर चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) हे छोटे गाव आहे. या गावात आनंदा पाटील यांची आठ एकर शेती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले प्रकाश, दिलीप व संजय हे बंधू शेती करतात. पंचवीस वर्षांपूर्वी संपूर्ण क्षेत्रावर केवळ ऊस पीक होते. क्षेत्र जास्त असूनही उत्पादन मात्र मर्यादित होते. शिवाय त्यातून वर्ष- दीड वर्षानंतरच पैसा हाती यायचा. तिघा पाटील बंधूंनी वर्षभर उत्पन्नाचा स्रोत कसा येत राहील याचा विचार केला. मार्केटचा अभ्यास केला. उसाचे क्षेत्र कमी करून, फेरपालट करून कमी कालावधीची विविध पिके घेत राहिल्यास चांगला नफा मिळत राहील असे उमगले..Agriculture Success Story: ज्योतीताईंनी शोधल्या प्रगतीच्या वाटा.कलिंगडाचा भागातील धाडसी प्रयोगवीस वर्षांपूर्वी पाटील यांनी वीस गुंठे क्षेत्रात कलिंगडाचा प्रयोग केला. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात त्यावेळी कलिंगडाचे पीक फारसे कुणी घेत नव्हते. मात्र अन्य भागात राहणाऱ्या पाहुण्यांच्या सल्ल्याने व मदतीने त्यांनी हे धाडस केले. सुरुवातीच्या टप्प्यात उत्पादन व विक्रीबाबत अडचणी निर्माण झाल्या. कारण नवा अनुभव होता. अनेकदा पीक व्यवस्थापन करताना नुकसानही झाले. पण हळूहळू या पिकातील कौशल्य आत्मसात होऊ लागले. मार्केटिंग जमू लागले. पैशाचा ओघ दरवर्षी चांगल्या प्रकारे सुरू राहिला. त्यामुळेच आज हे पीक इतक्या वर्षांनंतरही कायम ठेवण्यात पाटील कुटुंब यशस्वी झाले आहे..चक्राकार पीक पद्धती आकारासउसाला कलिंगडाची चांगली साथ मिळाल्याचे सिद्ध झाले. कमी कालावधीत रक्कम मिळत असल्याचे लक्षात येऊ लागले. आता केवळ कलिंगडावर अवलंबून न राहाता कमी कालावधीची अन्य पिकेही घेण्याचा पुढील विचार सुरू झाला. त्यातून पीक फेरपालट होणार होतीच. शिवाय जमिनीचा पोत सुधारणार होता. मुख्य म्हणजे दररोज ताजा पैसा हाती येण्याची संधी मिळू शकणार होती. बाजारपेठांतील मागणीचा अभ्यास इथे पुरेपूर उपयोगी ठरला. त्यातूनच पुढे आकारास आली ऊस- कलिंगड- मिरची व झेंडू अशी वर्षभराची चक्राकार पद्धती. या पद्धतीविषयी सविस्तर सांगायचे तर आठ एकरांपैकी पाच एकरांत ऊस असतो. त्याचा खोडवाही घेतला जातो. खोडवा तुटल्यानंतर तेथे पुन्हा ऊस लावण न करता ते क्षेत्र अन्य पिकांसाठी वापरले जाते..चक्राकार पीक पद्धतीचे नियोजनउसाव्यतिरिकत कोणतेही पीक वीस गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्रात घेतले जात नाही.मनुष्यबळ कमी असल्याने क्षेत्र मर्यादित ठेवले जाते.ऊस तुटून गेल्यानंतर मशागत करून डिसेंबरमध्ये होते कलिंगडाची लागवड.फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हा प्लॉट जवळपास संपतो. त्यानंतर सुरू होते मिरचीचे पीक.जूनपर्यंत मिरची उत्पादन देत राहते. त्यानंतर सुरू होतो झेंडूचा काळ..Farmer Success Story : भाताला भाज्या-केळीची जोड शेतीचे अर्थकारण झाले गोड .गणपती उत्सवासाठी स्वतंत्र व दसरा- दिवाळीसाठी स्वतंत्र असे झेंडूचे दोन टप्प्यांत घेतले जाते उत्पादन.ठिबक सिंचन, पॉली मल्चिंगचा होतो वापर. सेंद्रिय अधिक रासायनिक अशा दोन्ही पद्धतींनी होते व्यवस्थापन.दरवर्षी पीक फेरपालट होत असल्याने बुरशीजन्य व अन्य रोगांचा धोका कमी होतो.व्यावसायिक पिकांव्यतिरिक्त घरच्यासाठी उसात हरभरा, तीळ, सूर्यफूल आदी पिके घेतली जातात. घरीच घाणा असल्याने घरच्या घरीच तेल काढले जाते..कुटुंबाची एकजूट ठरली महत्त्वाचीपाटील यांचे चौदा सदस्यांचे कुटुंब एकाच घरात राहते. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या युगात पाटील कुटुंबाने जपलेली ही संस्कृती निश्चितच आदर्श म्हणावी लागेल. वडील आनंदा, आई आनंदी, प्रकाश, त्यांची पत्नी राणीताई, दिलीप, यांची पत्नी वनिता, संजय व त्यांची पत्नी सुनीता असे घरातील सर्व सदस्य शेतात राबतात. एकमेकांच्या साथीने त्यांनी शेतातील व घरातील कष्टांचा भार हलका केला आहे. दिलीप भूमाता शेतकरी गटाच्या माध्यमातून सक्रिय आहेत. कृषी विभागाकडून त्यांना माती परीक्षण, हरभरा बियाणे यांचा लाभ मिळतो. गटाच्या माध्यमातून कृषी निविष्ठा कंपन्या, कृषी विभाग यांच्याशी ते सातत्याने संपर्कात असतात..अर्थकारणाला बळकटीकलिंगडाचे वीस गुंठ्यांत १२ ते १३ टनांच्या आसपास उत्पादन मिळते. किलोला सात ते बारा रुपये दराने व्यापारी जागेवरून खरेदी करतात. लाल व पिवळा अशा दोन्ही झेंडूंचे उत्पादन घेतले जाते. वीस गुंठ्यांत त्याचे चार टनांच्या आसपास उत्पादन मिळते. त्याला किलोला २० रुपयांपासून ते ५० व कमाल १०० रुपयांपर्यंतही दर मिळतो. सणासुदीच्या काळात हा दर जास्त मिळतो. मिरची रोजच्या तोड्याला १०० किलो मिळते. तीच स्थिती झेंडूची असते. .त्याचीही तोडणी दररोज होत असते. कोल्हापूरच्या फुलबाजारांबरोबरच कळे परिसरातील हार विक्रेते दररोज फुले घेऊन जातात. एकूणच चक्राकार पद्धतीत कमी कालावधीच्या तीन पिकांमधून वर्षभर ताजा पैसा हाती येत राहतो. त्यातून दैनंदिन खर्च भागवता येतात. उसाचे एकरी पन्नास ते पंचावन्न टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यातून दीड वर्षांतून पैसे मिळतात. त्यातील रक्कम शिलकीत ठेवता येते. यंदाच्या दत्त जयंती दिवशी एका दिवसात बारा हजार रुपयांपर्यंतची रक्कम झेंडू विक्रीतून आली. सध्या घराचे बांधकाम सुरु असल्याने त्यातील कोणत्या ना कोणत्या कामासाठी ताज्या उत्पन्नातील रक्कम वापरली जात आहे.दिलीप पाटील ९०११८०३४४१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.