नागपूर जिल्हा ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखला जातो. मात्र अलीकडील वर्षांमध्ये सावनेर तालुक्यात फुलशेतीने वेग घेतला असून, येथील शेतकऱ्यांनी त्यात चांगले यश कमावले आहे. हा भाग ‘फ्लॉवर व्हॅली’कडे वाटचाल करत आहे. गुलाब, निशिगंध. झेंडू आदी विविध फुलांच्या लागवडी तालुक्यात सर्वत्र दिसून येतात. त्यातूनच बारमाही उत्पन्नाचा ताजा स्रोत येथील शेतकऱ्यांनी तयार केला असून, त्यातून शेतीचे अर्थकारण त्यांनी बळकट केले आहे. .विदर्भ आणि त्यातही नागपूर म्हटले, की संत्रा आणि कापूस या दोन मुख्य पिकाचे महत्त्व अधोरेखित होते. राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड असून, पैकी सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या नागपूर जिल्ह्यात आहे. राजे रघुजी भोसले यांनी राजवाड्यात केलेल्या संत्रा लागवडीपासून या भागाची ओळख जागतिक स्तरावर निर्माण झाली. मात्र याच जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात गेल्या दोन दशकांत फुलशेतीचा प्रयोग यशस्वी ठरला असून, फुलांचे क्लस्टर उभे राहत आहेत..Flower Farming: फुलशेतीतील मूल्यवर्धनातून कुटुंबाला आर्थिक सक्षमता .बाजारभेटीतून घडले परिवर्तनइसापूर (ता. सावनेर) येथील नरेंद्र महल्ले यांच्याबाबत घडलेली एक साधी घटना तालुक्यातील परिवर्तनाची नांदी ठरली. नरेंद्र सांगतात, की त्यांचे वडील एका कंपनीत कामगार होते. त्यांची मोजकी शेती होती. पगारातून थोडी- थोडी बचत करत वडिलांनी अडीच एकर शेती खरेदी केली. त्याच काळात नरेंद्र बारावीमध्ये शिकत होते. एकदा मित्रासोबत बाजारात फुले आणण्यासाठी गेले असता त्या रंगीबेरंगी फुलांनी मन वेधून घेतले. त्याच क्षणी फुलशेती करण्याचा विचार मनात पक्का झाला. अर्थात, या पीकपद्धतीविषयी माहिती काहीच नव्हती. चौकशी करता बोरगाव येथील राऊत नामक शेतात हैदराबादी गुलाबाची लागवड असल्याचे कळले. तेथे भेट दिल्यानंतर लागवड, व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती मिळाली. मग पुणे येथून रोपे मागवून २००६ मध्ये अडीच हजार रोपांची लागवड केली. हाच क्षण माझ्यासाठी आणि या संपूर्ण भागासाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरल्याचे नरेंद्र सांगतात..सावनेर तालुक्यात फुलशेतीचा विस्तारनरेंद्र यांनी कौशल्यातून फुलशेती यशस्वी केली. त्याची प्रेरणा इसापूर लगतच्या वेलतूर, दहेगाव, वाकोडी, पाटणसावंगी या गावांतील शेतकऱ्यांना मिळाली. त्यातून गुलाब, निशिगंध, झेंडू अशा विविध फुलांची शेती बहरू लागली. आजमितीला या भागा ७० एकरांहून अधिक क्षेत्रावर गुलाब, तर ३० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर निशिगंध व झेंडूची लागवड दिसून येते. सावनेर तालुक्यात आज सर्वत्र फुलशेतीचा विस्तार झाला आहे. प्रातिनिधिक उदाहरण घ्यायचे, तर नरेंद्र महल्ले यांची पाच एकर शेती असून, अडीच ते तीन एकरांत ते फुलशेती करतात. निशिगंध, गुलाब व झेंडू यातून त्यांना बारमाही उत्पन्न मिळते. हैदराबादी व शिर्डी गुलाबाचे प्रयोगही त्यांनी केले आहेत. यंदा सुगंधी देशी गुलाब वाण निवडला आहे. मोठी दांडी असलेल्या वाणांना सत्कार- समारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी मोठी मागणी असते. देशी, सुगंधी गुलाबाला पूजेसाठी मागणी असते. बाजारपेठेतील या संधी शोधून तसे वाण निवडण्यात आले आहेत..Aster Flower Farming: ॲस्टरकडे शेतकऱ्यांची पाठ.लागवड तंत्रज्ञान आणि उत्पादननरेंद्र सांगतात, की नोव्हेंबर-डिसेंबर हा कालावधी गुलाब लागवडीसाठी योग्य ठरतो. थंडीमुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो आणि झाडांची वाढ जोमाने होते. मध्यम प्रतीची आणि निचरा होणारी जमीन फुलशेतीसाठी योग्य ठरते. भारी जमिनीत कापूस, तूर, हरभरा अशी पिके घेण्यात येतात. सिंचनासाठी विहीर खोदून ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून शेत समतल केले आहे. लागवडीनंतर ४५ दिवसांनी उत्पादन सुरू होते. तर ६० दिवसांनंतर उत्पादन नियमित मिळू लागते. गुरुपौर्णिमा, गणेश चतुर्थी, ईदसह विविध उत्सवांमध्ये दर तेजीत राहतात..चांगल्या हंगामात दर प्रति किलो ३०० रुपयांपर्यंत जातात. तर अन्य वेळी ४० ते ५० रुपये किलो असा दर मिळतो. रोपांचा खर्च एकदाच असल्याने पुढील वर्षांमध्ये नफा वाढतो. नरेंद्र यांनी पाव एकरांत निशिगंधाची लागवड केली आहे. त्याचे कंद स्थानिक शेतकऱ्यांकडून २५ रुपये प्रति किलो दराने घेतले जातात. नरेंद्र यांनाही अनेक वेळा कंद विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते. झेंडूची लागवडही टप्प्याटप्प्याने केल्यामुळे बारमाही उत्पन्न मिळत राहते. नरेंद्र यांनी फुलशेतीतून चांगले वार्षिक आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. तृप्ती आणि वैभवी या दोन्ही मुलींना उच्चशिक्षण देता येत आहे. कृषी विभागाच्या अनुदानातून त्यांनी पॅक हाउस उभारले आहे. पत्नी वैशाली यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीत सक्रिय असते. शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारानेही नरेंद्र यांचा सन्मान झाला आहे..Aster Flower Farming: रंगबिरंगी आकर्षक ॲस्टरची लागवड.फूल उत्पादक झाले संघटिततालुक्यातील फुलशेतीचे प्रस्थ पाहता कृषी विभागाच्या पुढाकारातून निशिगंध शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे. दर मंगळवारी सकाळी कंपनीच्या सदस्यांची बैठक घेतली जाते. फुलशेतीसंबंधीच्या चर्चा, समस्या, उपाय, मार्गदर्शन असे त्याचे स्वरूप असते. पूर्वी कापूस व तूर याच पिकांवर अवलंबून असलेल्या या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजुरीसाठी बाहेर जावे लागे. त्यांचेही अर्थकारण फुलशेतीतून उंचावले आहे. मनरेगा व कृषी विभागाच्या योजनांनी या बदलाला बळ दिले आहे. या भागात कार्यशाळा, मेळाव्यांचे आयोजन केले जाते. विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, सावनेर तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे, उपकृषी अधिकारी रोशन डंभारे, अनिल खरपुरीये व सहाय्यक कृषी अधिकारी पूजा इंगळे यांचे मार्गदर्शन होते..भाऊ अभिषेक व मी असे प्रत्येकी तीन एकर क्षेत्र आहे. संपूर्ण क्षेत्रात गुलाब आहे. पूर्वी भाजीपाला घेत होतो. चार वर्षांपासून फुलशेतीत सातत्य असून, यातून त्यातून नियमित उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे.वैभव चौधरी ७३८७८३७३८०, (दहेगाव).नरेंद्र महल्ले ८८८८९६०७३५रोशन डंभारे ८२७५३९६७३५(उपकृषी अधिकारी, खापा).पाच एकरांपैकी एक एकरांत गुलाब लागवड असून, तीन वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. सध्या १५० ते २०० रुपये प्रति किलो दर मिळतो आहे. गुलाबासोबत पेरू लागवड व त्यात हरभऱ्याचे आंतरपीक घेतले आहे. अशा प्रकारे उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत.इक्बाल गफार बराडे ९३०७५३३२९३ (वेलतूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.