Dairy Farming Success: परभणी जिल्ह्यातील भोगाव साबळे येथील साबळे बंधू काही वर्षांपासून गीर गाईंचे संगोपन करतात. आपल्याकडील तसेच परिसरातून देशी दुधाचे संकलन करून रतीब व प्रक्रियायुक्त उत्पादने असा उद्योग त्यांनी उभारला आहे. उत्पादनांचा दर्जा जपून बाजारपेठ विक्री व्यवस्था तयार केली आहे. सुमारे ४० ते ५० लाखांच्या वार्षिक उलाढालीतून उद्योगाद्वारे शेती व कुटुंबाला आर्थिक सक्षमता प्राप्त करून दिली आहे. .अलीकडील काही वर्षांत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूरक, प्रक्रिया उद्योगांची जोड देत शेतीतील जोखीम कमी केली आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या अनुषंगाने दुष्काळ, अतिवृष्टी आदी नैसर्गिक अरिष्टांमध्येही हे शेतकरी तग धरून आहेत. परभणी जिल्ह्यातील साबळे बंधू त्यापैकीच एक आहेत. त्यांचा शेती व प्रक्रिया उद्योगातील प्रवास प्रेरणादायी असाच आहे..परभणी शहरापासून सुमारे १९ किलोमीटरवरील भोगाव साबळे येथील रामेश्वर, उत्तम व विठ्ठल या तिघा साबळे बंधूंची शिवारात मध्यम ते भारी प्रकारची २० एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहिरीची सुविधा आहे. खरीप, रब्बी तसेच चारा पिकांचे उत्पादन ते घेतात. त्यांचे वडील नामदेवराव यांना पशुधनाची आवड होती. त्यातूनच आमडापूर (ता. परभणी) येथील साखर कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या गीर गाईपालक गुर्जरांसोबत ते काही काळ राहिले. त्यांच्याकडून या देशी गोवंशाचे संगोपन व अर्थकारण याविषयी सविस्तर माहिती घेतली..Dairy Farming: गोपालनात नियमित व्यवस्थापन हीच गुरुकिल्ली.गीर गाईंचे संगोपन व सुविधादेशी म्हणजे गीर गाईंच्या संगोपनावरच दिला भर.गुजरात राज्यातून २०१५ मध्ये प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपये किमतीच्या घेतल्या तीन गीर गाई.गावापासून दीड किलोमीटरवरील शेतात सुमारे ५० बाय २० फूट आकाराचा व पत्र्याचे शेड असलेला गोठा उभारला. त्यात अनेक सोयी केल्या.स्वच्छता ठेवणे सोपे जावे म्हणून बनविली सिमेंट काँक्रीटची गच्ची.स्वच्छ पाण्याची तसेच गोमूत्र वाहून नेण्याची व्यवस्था..गोठ्याचे दोन विभाग करून एका बाजूला दुधाळ गाईंची तर दुसऱ्या बाजूला भाकड गाई व वासरांची व्यवस्था. त्यांच्यासाठी मुक्तसंचार पद्धतीचा ८० बाय ५० फूट आकाराचाही गोठा.स्वच्छ पाण्याची व्यवस्था.रेतनासाठी जातिवंत गीर वळूचे संगोपन. मुळे वंशशुद्धी राखण्यास मदत होते.शेतासाठी भरपूर शेणखत उपलब्ध होते. स्वतःच्या शेतात वापर करून शिल्लक गोखुर खताची विक्री.वैरणीसाठी ऊस तसेच रब्बी ज्वारीची लागवड. गरज पडल्यास ज्वारीचा कडबा विकत घेतात..Dairy Farming: शेती, दुग्ध व्यवसायानेच दिला खरा आनंद.प्रक्रिया उद्योगाची उभारणीसुरुवातीला तीन व नंतर सहा गाई अशा नऊ गाईंपासून आजमितीला गोठ्यात ४० पर्यंत (लहान-मोठ्या मिळून) संख्या तयार झाली आहे. मध्यंतरी काही गाईंची विक्रीही झाली. सुरुवातीला संख्या कमी होती, त्या वेळी परभणी शहरात दुधाची विक्री व्हायची. त्या वेळी ६० रुपये प्रति लिटर दर होता. आता रोजचे दूध संकलन ७० लिटरच्या आसपास आहे. या व्यतिरिक्त परिसरातील दुग्धोत्पादकांकडूनही गीर गाईंचे दूध संकलित केले जाते. अशा रीतीने रोजचे एकूण दूध २७० लिटरच्या आसपास उपलब्ध होते. बहुतांश दुधाचे परभणी शहरात ७० रुपये प्रति लिटर दराने रतीब घातले जाते. उर्वरित दुधापासून दही, पनीर, तूप, खवा, बासुंदी आदी पदार्थांची निर्मिती ग्राहकांच्या मागणीनुसार व सण-समारंभ लक्षात घेऊन होते..सन २०२३ मध्ये स्थापन झालेल्या पारदेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीचे रामेश्वर अध्यक्ष आहेत. कंपनीच्या सदस्यांनी उत्पादित केलेला माल व प्रक्रिया उत्पादने यांच्या विक्रीसाठी जिंतूर रस्त्यावरील एकनाथ नगर येथे कंपनीचा स्टॉल आहे. ग्राहकांची मागणी घेऊन घरपोच सेवाही दिली जाते. ज्वारी, बाजरी, गहू आदी धान्ये, गूळ पावडर आदींचा या उत्पादनांमध्ये समावेश आहे. रामेश्वर यांनी लोहगाव (ता.परभणी) शिवारात ११ एकर शेती भाडेतत्वावर घेतली आहे. तेथे शेवगा, कढीपत्ता, पुदिना यांची लागवड केली आहे. शेवग्याच्या पानांपासून पावडर (मोरिंगा) तयार करून नुकतीच विक्री सुरू केली आहे..जबाबदाऱ्यांची विभागणीरामेश्वर, उत्तम व विठ्ठल या तिन्ही बंधूंनी शेती व प्रक्रिया.या उद्योगातील आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. रामेश्वर व उत्तम यांचे परभणीत वास्तव्य असते. उत्पादन ते विक्रीपर्यंतच्या सर्व बाबी ते पाहतात. तर विठ्ठल गावी शेती व गोसंगोपन पाहतात. रामेश्वर यांना पत्नी मीरा, मुले ईश्वर व जगन्नाथतसेच कुटुंबातील अन्य सर्व सदस्यांची उद्योगात मोठी मदत होते..दुग्धप्रक्रिया -उत्पादन ते विक्री व्यवस्थापरभणी शहरातील एकनाथ नगर येथे भाडेतत्वावरील जागेवर प्रक्रिया उद्योग.बल्क कुलर, आधुनिक खवा व पनीर निर्मिती यंत्र, क्रीम सेपरेटर आदी यंत्रसामग्री.पारंपारिक पद्धतीने महिनाभरात १०० ते १५० किलो तूप निर्मिती. काचेच्या जारमधून २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम व एक किलो पॅकिंगमधून प्रति लिटर १८०० रुपये दराने विक्री. तुपाला मुंबई, पुणे आदी ठिकाणचे ग्राहक जोडले आहेत. देशी तूप असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी. माऊथ पब्लिसिटीमुळे हैदराबाद, छत्तीसगड राज्यापर्यंत तुपाचे ग्राहक तयार झाले आहेत..दूध रतिबाचे सुमारे १५० ग्राहक. दूध पोचवण्यासाठी कामगार तैनात केले आहेत.अन्य प्रक्रियायुक्त पदार्थांचा थेट ग्राहकांना तसेच केटरर्स यांना पुरवठा.खव्यात विशिष्ट प्रमाणात साखर, वेलची यांचा वापर करून अस्सल चवीच्या पेढ्यांची निर्मिती.सहा वर्षांतील अनुभवातून साबळे बंधूंना प्रक्रिया निर्मितीचे कौशल्य अवगत झाले आहे.परभणी शहरात दोन ठिकाणी स्वतःचे विक्री स्टॉल्स. तेथे सायंकाळी मसाला दुधाचीही विक्री.दिवसाला सरासरी १८० ग्लास दुधाची होते विक्री.वर्षभरात एकूण ४० ते ५० लाखांपर्यंत होते उलाढाल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.