Sustainable Horticulture:शेतकरी नियोजन । संत्रा बाग शेतकरी ः अशोक बापूराव विरखरे गाव ः भिलापार, ता. सौंसर (मध्य प्रदेश) संत्रा क्षेत्र : साडेदहा एकर.नागपूर-मध्य प्रदेश सीमेवरील सिंदेवानी चेकपोस्टलगत असलेल्या भिलापार परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर संत्रा लागवड केली जात होती. मात्र योग्य व्यवस्थापनाचा अभाव, पाण्याचे नियोजन व कीड-रोग नियंत्रणातील अडचणी यामुळे अनेक शेतकऱ्यांनी संत्रा बागा काढून टाकल्या. विरखरे कुटुंबाची देखील पूर्वी संत्रा लागवड होती. मात्र कालांतराने संत्रा क्षेत्र कमी होऊन कापूस, तूर, सोयाबीन या पिकांकडे कल वाढला. अशोक बापूराव विरखरे यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पुन्हा संत्रा बाग व्यवस्थापनावर भर दिला. सध्या बागेत २२ वर्षांची सुमारे १५०० झाडे आहेत. .Fig Orchard Management: अंजीर बागेचे व्यवस्थापन .मागील काही वर्षात उष्णतेमुळे व नैसर्गिक कारणांमुळे काही झाडे नष्ट झाली होती. त्याजागी मागील वर्षी पावसाळ्यात पुन्हा नव्याने झाडांची लागवड केली. त्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेकडून रोपांची उपलब्धता केली. जुन्या बागेतील लागवड अंतर १८ बाय १८ फूट इतके होते. नव्या लागवडीत एका रांगेत अतिरिक्त रोपे लावून ९ बाय १८ फूट अंतर ठेवण्यात आले. त्यामुळे उपलब्ध जागेचा कार्यक्षम वापर होण्यासोबत खत व सिंचन व्यवस्थापन अधिक सुलभ झाले आहे, असे अशोक विरखरे सांगतात..बहर नियोजनबागेत प्रामुख्याने मृग बहर व्यवस्थापनावर भर दिला जातो. त्यानुसार मे महिन्यात प्रति झाड ७० किलो चांगले कुजलेले शेणखत दिले जाते. त्यासाठी नागपूर जिल्ह्यातून शेणखत खरेदी केली जाते. शेणखत दिल्यानंतर रोटाव्हेटरच्या साहाय्याने ते जमिनीत मिसळले जाते.रासायनिक खत व्यवस्थापनात प्रारंभी १०:२६:२६ या विद्राव्य खतांच्या संतुलित मात्रा दिल्या जातात. त्यानंतर झिंक, बोरॉन व कॅल्शिअम आदी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो.झाडांच्या वाढीचा व फळधारणेचा अंदाज घेऊन संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे नियोजन केले जाते. आगामी काळात बाजारात उपलब्ध नव्या विद्राव्य खतांचा तसेच जैव उत्पादनांचा वापर परिस्थितीनुसार केला जाणार असल्याचे अशोक सांगतात..सिंचन व्यवस्थापनसिंचनासाठी एक विहीर व एक बोअरवेल उपलब्ध आहे. बोअरवेलमधील पाणी विहिरीत साठवून त्यानंतर तुषार सिंचन पद्धतीने संपूर्ण बागेला पाणी दिले जाते. बागेखालील सर्व क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी साधारण पाच दिवस लागतात. त्यानंतर जमिनीतील ओलावा, तापमान व वातावरणातील आर्द्रता लक्षात घेऊन पुढील सिंचनाचे नियोजन केले जाते. मॉन्सूनपूर्व काळात जमिनीतील अतिरिक्त ओलावा टाळण्यावर भर दिला जातो. त्यामुळे फुलधारणेपूर्वी झाडांवर अनावश्यक पालवी येण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते..Orange Orchard Management: फळधारणा अवस्थेतील संत्रा बागांचे व्यवस्थापन .मागील कामकाजमे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ०:५२:३४ या विद्राव्य खतांची फवारणी केली आहे. या माध्यमातून झाडांना फॉस्फरसचा पुरवठा होऊन फुलधारणेस पोषक स्थिती निर्माण होते. तसेच नियंत्रित पालवी फुटून फळधारणेस साहाय्य होते.या फवारणीसोबत शिफारशीत रासायनिक कीडनाशके व बुरशीनाशकांची एकत्रित फवारणी केली जाते. पहिल्या फवारणीनंतर साधारण १२ ते १५ दिवसांनी दुसरी केली जाते. मॉन्सूनपूर्व वातावरणात मावा, तुडतुडे व फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाईल.फुलांचे फळांमध्ये रूपांतर होत असताना १३:०:४५ या विद्राव्य खतासोबत आवश्यक कीडनाशके व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाते. त्यानंतर फळगळ कमी ठेवण्यासाठी आणि फळांची वाढ संतुलित राहण्यासाठी साधारण १५ दिवसांच्या अंतराने प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात..आगामी नियोजनमागील वर्षी लागवड केलेल्या नवीन रोपांच्या वाढीवर विशेष लक्ष दिले जाईल.पुढील काळात ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता आहे. त्यानुसार हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कीड व रोग नियंत्रणासाठी शिफारशीत घटकांची फवारणी केली जाईल.ढगाळ वातावरणामुळे बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेचे नियमित निरिक्षण करून प्रतिबंधात्मक रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील..आगामी काळात पावसाची शक्यता लक्षात घेऊन सिंचनाचा कालावधी कमी जास्त केला जाईल. पावसात खंड पडल्यास झाडांची गरज आणि जमिनीतील ओलावा यांचा अंदाज घेऊन तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे.नवीन लागवडीतील रोपांच्या वाढीवर विशेष लक्ष दिले जाईल.फळधारणेनंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या शिफारशीप्रमाणे वापर केला जाईल. जेणेकरून झाडे अधिक सक्षम होतील. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अधिक करण्याचे नियोजन आहे.- अशोक विरखरे, ९५११७११५४१(शब्दांकन ः विनोद इंगोले).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.