Moringa Powder Startup Success: घोडेगाव (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील महेश कदम व कुटुंबीयांनी ड्रायरमधील उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून हायजेनिक पद्धतीने शेवगा पाल्यापासून पावडर निर्मिती उद्योगाचा स्टार्ट अप सुरू केला आहे. खास पाल्यासाठीच्या तीन एकरांत शेवगा वाणाची लागवड केली आहे. सोबतच बीटरूट पावडर व नैसर्गिक पद्धतीच्या साबणांची निर्मिती करून अर्का ड्राइड नॅचरल्स या ब्रॅंडने गुणवत्ताप्राप्त उत्पादने सादर केली आहेत.
Moringa leaf powder manufacturing business in MaharashtraAgrowon