Khandesh Agriculture: रब्बी हंगामातील पिकांचा काढणी हंगाम संपून आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. पावसानेही जोर पकडला आहे. खानदेशातील प्रसिद्ध कोरडवाहू दादर ज्वारीचा काढणी हंगामही आता आटोपला आहे. हुकमी व चांगला नफा देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांसाठी ते उपयोगी ठरत आहे. यासोबत उन्हाळी बाजरी देखील त्याच पद्धतीने चांगला नफा देणारे पीक बनले आहे. दोन्ही पिकांचे मार्केट जोरात आहे. यंदाची ज्वारी व बाजरीची आवक व दर यांच्या अनुषंगाने घेतलेला खानदेशातील बाजारपेठेचा मागोवा. .खानदेशात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी केली जाते. त्यापाठोपाठ धुळे व नंदूरबार जिल्ह्यात पेरणी असते. साधारणतः दिवाळीनंतर पेरणीचा प्रघात असतो. कारण या काळात चांगला वाफसा असतो. शेतकरी पारंपरिक वाणांना पसंती देतात. साहजिकच बाजारातून त्याचे बियाणे आणावे लागत नाही..कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन हंगांमात जळगाव जिल्ह्यात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी सरासरी १८ हजार हेक्टरवर, धुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टर तर नंदूरबार जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरवर झाली. कोरडवाहू दादर ज्वारी जवळपास सेंद्रिय पध्दतीचीच असते. त्यात रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर फारच अल्प प्रमाणात केला जातो..Jowar Farming Tips: चांगल्या उत्पादनासाठी ज्वारी लागवडीचे नियोजन कसे करावे? .अशा राहिली आवक व दरमार्चमध्ये सर्वत्र कोरडवाहू दादर ज्वारीची कापणी अर्थात बाजारातील आवक सुरू होते. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत आवक सर्वाधिक असते. काही शेतकरी साठवणूक करून मे व जूनमध्येही विक्री करतात. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा व अमळनेर या बाजार समित्या, धुळे जिल्ह्यात शिरपूर व दोंडाईचा (ता.शिंदखेडा) तर नंदूरबार जिल्ह्यात शहादा व नंदुरबार या बाजार समित्या दादर ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. दादर ज्वारीची थेट किंवा शिवार खरेदी अपवादानेच केली जाते..बहुतांश शेतकरी आपापल्या नियोजनानुसार बाजार समितीत ज्वारी विक्रीसाठी आणतात. सन २०२५ मध्ये जळगाव, अमळनेर व चोपडा बाजार समितीत मिळून मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी ३३०० क्विंटल, एप्रिलमध्ये ३४०० क्विंटल अशी आवक राहिली. यंदा जळगाव, अमळनेर व चोपडा बाजार समितीत मार्चमध्ये प्रति दिन सरासरी २९०० क्विंटल तर एप्रिलमध्ये ती प्रतिदिन ३१०० क्विंटल राहिली. ज्वारीची पाठवणूक खानदेशातून गुजरात, मध्य प्रदेश, दाक्षिणात्य भागांसह राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी भागातही केली जाते..दादर ज्वारीचे दर (प्रति क्विंटल, रुपये.)वर्ष किमान दर कमाल दर सरासरी दर२०२४ २२०० ३००० २७००२०२५ २४०० ३५०० ३०००२०२६ २७०० ५००० ३६००.Jowar Farming: बागायती रब्बी ज्वारीचे उल्लेखनीय उत्पादन.चारा, बेवडसाठी बाजरी उपयुक्तबाजरीची पेरणी दरवर्षी डिसेंबरमध्ये धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री व शिंदखेडा तालुक्यांत केली जाते. तापी, गिरणा, पांझऱा, अनेर नदीच्या क्षेत्रात पेरणी बऱ्यापैकी असते. केळी उत्पादक बेवडसाठी बाजरीची पेरणी करतात. काळ्या कसदार जमिनीत चार वेळेस सिंचन केल्यास पीक हाती येते. शिंदखेड्याची बाजरी खानदेश, नाशिक, पुण्यापर्यंत प्रसिद्ध आहे. आकाराने बारीक, कडकपणा या बाजरीस असतो. बाजरीसाठी खानदेशात धुळ्यातील दोंडाईचा (ता.शिंदखेडा), धुळे, शिरपूर, जळगावमधील अमळनेर व चोपडा, चाळीसगाव येथील बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारांमध्ये एप्रिलच्या अखेरीस उन्हाळ बाजरीची आवक सुरू होते..ती जूनच्या सुरवातीपर्यंत सुरू असते. चोपडा व अमळनेर येथील बाजारात यंदा एप्रिलच्या अखेरच्या सात दिवसांत आवक बरी होती. त्या काळात चोपडा, अमळनेर व शिरपूर बाजारात मिळून प्रतिदिन अडीच हजार क्विंटल एवढी आवक झाली. मे अखेरीस आवक कमी झाली. जूनमध्ये अल्प आवक चोपडा बाजारात होती, अशी माहिती चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडतदार सतीश पाटील यांनी दिली. मागील तीन वर्षे उन्हाळी बाजरीचे दर स्थिर असून उत्पादनही चांगले येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत आहे..बाजरी उत्पादक शेतकरी म्हणून प्रातिनिधीक उदाहरण द्यायचे तर म्हैसवाडी (ता.यावल, जि.जळगाव) येथील प्रकाश जयसिंह चौधरी यांचे देता येईल. आठ वर्षे संकरित बाजरीची ते १० एकरांत पेरणी करतात. त्यांचे एकूण २५ एकर क्षेत्र असून चार कूपनलिका आहेत. कापूस पिकाखाली रिकाम्या झालेल्या काळ्या कसदार शेतात फेब्रुवारीत पेरणीवर भर असतो. घरी धान्य, मका कडब्यात बाजरी कुट्टीचे मिश्रण व्हावे व केळीला चांगले बेवड मिळावे यासाठी ते बाजरीला पसंती देतात. एकरी १५ क्विंटलच्या दरम्यान उत्पादन ते साध्य करतात. यंदा प्रति क्विंटल २२५० रुपये दर त्यांना चोपडा बाजार समितीत मिळाला..उन्हाळी बाजरीला मिळालेले दर (प्रति क्विंटल रूपये.)वर्ष किमान दर कमाल दर सरासरी दर२०२४ १७०० २३०० २१००२०२५ १८०० २४०० २२००२०२६ २००० २६०० २३००प्रकाश चौधरी - ९२७१८९१२२०सतीश पाटील, अडतदार, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती, चोपडा ८६६८२५६२७०.शेतकरी अनुभव वेले (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील शेतकरी प्रशांत त्र्यंबक पाटील ३० ते ४० वर्षे आपल्या सहा- सात एकर काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी करतात. मागील तीन वर्षे प्रति एकर १२ क्विंटल उत्पादन त्यांच्या हाती आले. पाऊसमान चांगले राहिल्यास पेरणी बऱ्यापैकी असते. मात्र पाऊसमान घटल्यास कोरडवाहू दादर ज्वारीचे गणीत बिघडते. दादर ज्वारीस मागील तीन वर्षे सरासरी २८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. एकरात १७५ पेंढ्या चारा मिळाला. प्रति शेकडा ४५०० रुपये दर कडब्यास मिळाला.प्रशांत पाटील - ८७६६४५५०३५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.