Rose Farming: दर्जेदार गुलाब उत्पादनात काळे यांचा हातखंडा
Rose Production: पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी तुषार काळे यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरत गुलाब लागवडीत हातखंडा तयार केला आहे. पॉलिहासमधील गुलाब लागवडीतून दर्जेदार उत्पादन घेत उत्पन्नवाढ साधण्यात यश मिळविले आहे.