Ice cream Goat Milk : शेळीच्या दुधापासून बनवलं आईस्क्रीम; दोन मित्रांनी अशी केली क्रांती, आज कमवतात कोट्यावधी रुपये

Ice cream Goat Milk : दोन मित्रांनी मिळून शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनवत मोठी क्रांती केली आहे. दोन मित्रांनी मिळून तब्बल ४० कोटींची कंपनी उभारली आहे.
Twisting Scoops
Twisting Scoopsagrowon

Twisting Scoops : तुम्ही यापूर्वी म्हैशींच्या किंवा गाईंच्या दुधाच्या व्यवसायातून मोठे उत्पन घेऊन यशस्वी झालेल्या व्यवसायीकांची गोष्ट वाचला असाल. दरम्यान दोन मित्रांनी मिळून शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनवत मोठी क्रांती केली आहे.

दोन मित्रांनी मिळून तब्बल ४० कोटींची कंपनी उभारली आहे. या दोन बालपणीच्या मित्रांनी आपली खाजगी नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू करून युवकांना नवा आदर्श घालून दिला आहे.

शेळीच्या दुधाच्या आईस्क्रीमची दोन बालपणीच्या मित्रांना व्यवसाय करण्याची कल्पना सुचली यातून त्या मित्रांना ४ ते ५ वर्षांत कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला. दोन पंजाबी मित्रांनी मिळून ही कल्पना काढली अन् ते आज शेकडो लोकांना रोजगार उपल्बध करून दिला आहे.

कंवरप्रीत सिंग आणि मनमीत सिंग असे या दोन बाल मित्रांची नावे आहेत.दोघांनी खासगी क्षेत्रातील नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. नोकरी करत असतानाच्या काळात सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी तुर्कीला जाण्याचा त्यांनी विचार केला.

Twisting Scoops
Goat Market : ईदनिमित्त परराज्यातून बकऱ्यांची आवक

यादरम्यान त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार आला. यावरून त्यांना Twisting Scoops सुरू करण्याची कल्पना आली. दोघांनी तुर्कीचे आईस्क्रीम भारतात आणले आणि येथे आल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये व्यवसाय सुरू केला.

यातून त्यांनी Twisting Scoops नावाची कंपनी उदयास आणली. ट्विस्टिंग स्कूप्स हा त्यांनी ब्रँड करत त्यांनी साखळी आइस्क्रीम साखळी तयार केली. या कंपनीत फक्त शेळीच्या दुधाचे आइस्क्रीम बनवून विक्री केली जाते. आज कंपनीकडे आइस्क्रीमचे ४५ पेक्षा जास्त फ्लेवर्स आहेत. त्यांचे आईस्क्रीम ७९ रुपयांपासून सुरू आहेत.

Twisting Scoops ही एक आइस्क्रीम चेन आहे. कंपनीचे देशभरात ५० पेक्षा जास्त आउटलेट आहेत. २०१६ मध्ये सुरू झालेली ही कंपनी महिन्याला सुमारे २.५ - २.२७ कोटी रुपयांचे आइस्क्रीम विकते.

कंवरप्रीत सिंग आणि मनमीत सिंग यांनी ट्विस्टिंग स्कूप्सद्वारे सुमारे २४० लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे. दिल्लीतील कीर्ती नगर येथे त्यांचे स्वतःचे उत्पादन युनिट आहे तेथून ते त्यांच्या सर्व आउटलेटला ७२ तासांच्या आत पुरवठा करतात.

याचबरोबर एअर इंडिया कार्गो या कंपनीसोबत त्यांनी भागीदारी आहे. त्यांनी त्यांचे पहिले आउटलेट चंदीगडमध्ये उघडले, यानंतर ते देशातील ५० शहरांमध्ये पसरले आहेत. अलीकडेच त्यांनी मुंबईतील विवियाना मॉलमध्ये त्यांचे नवीन आउटलेट उघडले आहे.

सिंग यांनी देशातील बहुतेक मॉल्स, महामार्ग, विमानतळांवर ट्विस्टिंग स्कूप्स आउटलेट्स उभारल्या आहेत. यामुळे त्यांचा व्यवसाय अजून वाढत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com