Honey Production : मधनिर्मिती बनतेय जिल्ह्याची नवी ओळख

सातारा जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती, मत्स्यशेती, अन्न प्रक्रिया उद्योग, डाळ मिल आदी व्यवसाय शेतीला पूरक म्हणून केले जातात. यामध्ये मधनिर्मिती हा शेतकऱ्यांना नवा शाश्‍वत पर्याय निर्माण झाला आहे.
Honey Production
Honey Production Agrowon

विकास जाधव
सातारा जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय (Dairy Business), रेशीम शेती (Silk Farming), मत्स्यशेती (Fishery), अन्न प्रक्रिया उद्योग, डाळ मिल आदी व्यवसाय शेतीला पूरक म्हणून केले जातात. यामध्ये मधनिर्मिती हा शेतकऱ्यांना नवा शाश्‍वत पर्याय निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील निसर्गसंपदा तसेच शासकीय योजनांमुळे जिल्ह्यातील मधनिर्मिती (Honey Production ) मोठ्या प्रमाणात वाढली असून जिल्ह्यातील मधाची गोडी देशभर पसरली आहे. सातारा जिल्ह्याचे दोन भाग पडतात एक माण, खटाव, फलटण दुष्काळी तर महाबळेश्‍वर, जावळी, पाटण हे अति पावसाचे तालुके आहेत.

Honey Production
Spices Production: मसाला निर्मितीमध्ये ‘संस्कृती’ची ओळख

या अति पावसाच्या तीन तालुक्यांत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलाचा वापर शेतकऱ्यांकडून चांगल्या पद्धतीने करून घेतले जात आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मधनिर्मितीत आघाडी घेतली आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगले तसेच कोयना धरणामुळे अनेक गावे कड्या कपारीत राहतात. या शेतकऱ्यांना मध व्यवसाय आता फायदेशीर झाल्याने दिवसेंदिवस या मधपाळांच्या संख्येत वाढ होत आहे.

Honey Production
‘क्यूआर कोड’ने स्ट्रॉबेरीची  बाजारात नवी ओळख

हंगामात होते २५ हजार किलो मध
साधारणपणे मधाचा हंगाम डिसेंबरपासून मे महिन्यापर्यंत सुरू राहतो. जिल्ह्यातील ७० ते ८० गावांतील १५०० हून अधिक शेतकऱ्यांकडे १२ ते १५ हजार मधपेट्या आहेत. यामध्ये सर्वाधिक महाबळेश्‍वरमध्ये आहेत. त्या पाठोपाठ वाई, पाटण, जावळी तालुक्यातील शेतकरी मधशेती करतात. या सहा महिन्यांत या मधपाळांकड़ून ३० ते ३५ हजार किलो मध तयार होत असते. मधसंचालनालयाकडून ५०० रुपये किलोप्रमाणे खरेदी केला जाते.

Honey Production
देगलूर तालुक्याची पेरू पिकात नवी ओळख

काही शेतकरी स्वतः पॅकिंग करून विक्री करतात. २०१७-१८ पासून सेंद्रिय मधाचा ब्रँड ठसवण्यावर अधिक भर देण्यात आला. प्रतापगड, तापोळा परिसरात पेट्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. या परिसरात कीटकनाशकांचा वापर टाळण्यासाठी कृषी विभाग व मधसंचालनालयाकडून जनजागृत्ती केली जात आहे. या परिसरात सेंद्रिय मध तयार होत असल्याने देशभर या महाबळेश्‍वरच्या मधामुळे जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली आहे.

मधाचे गाव
महाबळेश्‍वर तालुक्यातील मांघर हे देशातील पहिले मधाचे गाव झाले असून शास्त्रोक्त पद्धतीने मधनिर्मिती केली जात असल्याने मधपाळांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मांघरनंतर वाई तालुक्यातील जोर हे मधाचे गाव म्हणून जाहीर केले जाणार आहे. या ठिकाणीही मधनिर्मितीपासून सर्व कामे केली जाणार आहेत.


शंभर टक्के अनुदान
मधमाश्‍यांच्या वसाहतीचे जतन व संवर्धन करणे या उद्देशाने जिल्हा परिषद व मधसंचालनालय यांच्या वतीने शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याची नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. मधसंचालनालय महाबळेश्‍वर व जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून प्रत्येकी ५० टक्के असे शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेला जिल्हा परिषदेच्या ठराव समितीने मान्यता दिली असून, या वर्षी महाबळेश्‍वर, वाई, जावळी, सातारा, पाटण, माण व खटाव तालुक्यांत ही योजना राबवण्यात येणार आहे.


कातकरी समाजातील लोक मोठ्या प्रमाणात मधनिर्मिती करत आहेत; मात्र हा व्यवसाय पांरपरिक पद्धतीने केला जात असल्यामुळे दर्जेदार मध तयार होत नसून अपेक्षित दरही मिळत नाहीत. या समस्या दूर करण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा मॅडम व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शानाखाली मधसंचालनालय कार्यालयाच्या वतीने जावळी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर शास्त्रोक्त पद्धतीने मधनिर्मितीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना मोफत प्रशिक्षण आवश्यक साहित्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
- दिग्विजय पाटील, संचालक मध संचालनालय, महाबळेश्‍वर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com