निर्जलीकरण केलेल्या पावडरींचा गणेशा ब्रॅण्ड !

भाज्यांचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) करून त्यांची पावडर तयार करण्याचा उद्योग
kade Owner of Ganesha Brand
kade Owner of Ganesha BrandAgrowon
Published on
Updated on

भाज्यांचे निर्जलीकरण (Dehydration of vegetables) व पावडर निर्मितीचा स्टार्ट अप मोहोळ (जि. सोलापूर) येथील बी टेक पदवीप्राप्त सुदर्शन सुहास कादे या युवा तरुणाने सुरू केला आहे. आकर्षक पॅकिंगद्वारे ‘गणेशा’ ब्रॅण्ड तयार करीत
मोठी शहरे तसेच ऑनलाइन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांद्वारे उत्पादनांना बाजारपेठ देण्यास सुरुवात
केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वाळूज (ता. मोहोळ) येथील सुदर्शन कादे या तरुणाची शिरापूर येथे १२ एकर शेती आहे. मोहोळ येथून त्याने ‘फूड टेक्नॅालॅाजी’ विषयातून २०१९ मध्ये बी. टेक.ची पदवी घेतली.
अन्नप्रक्रिया उद्योगच करायचा हे मनाशी बाळगून त्यातील संधी शोधण्यास सुरुवात केली.
काही ठिकाणी भेटी दिल्या. त्यातून भाज्यांचे निर्जलीकरण (Dehydration of vegetables) (डीहायड्रेशन) करून त्यांची पावडर तयार करण्याचा उद्योग निश्‍चित केला. आई विजयश्री यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी स्टार्ट अप सुरू केला.

उद्योगाची तयारी

मोहोळ एसटी बस स्थानकाशेजारी प्रकल्प उभा राहिला. पहिल्या टप्प्यात ‘ड्रायर’ आणि ग्राइंडर अशी दोन यंत्रे घेतली. ज्याद्वारे अनुक्रमे भाज्या वाळवणे व पावडर तयार करणे शक्य होते. एकूण दहा लाख रुपयांची गुंतवणूक घरूनच रक्कम उभारून केली. कांदा, लसूण, आले, टोमॅटो, शेवगा पान, कढीपत्ता आणि आवळा या सात प्रकारच्या भाज्यांची निवड केली. या कच्च्या मालासाठी शेतकऱ्यांकडून (Farmer) खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यासाठी बाजारभावापेक्षा थोडा फार दर जास्त दिला जातो. गरज भासल्यास बाजार समितीतून खरेदी होते. भविष्यात स्वतःच्या शेतातच भाजीपाला (Vegetable) पिकवण्याचा
विचार आहे. शेतकरी उत्पादक (Farmer Producer) कंपनी स्थापून त्या माध्यमातूनही कच्चा माल उपलब्ध करण्याचा
विचार आहे.

kade Owner of Ganesha Brand
आयटीसी स्थापन करणार पाच वर्षांत ५ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या  

अशी आहे उत्पादन प्रक्रिया
-भाज्या पाण्याने स्वच्छ धुतल्या जातात.
-त्यानंतर त्यांचे बारीक काप (स्लाइस) केले जातात.
-त्यानंतर ड्रायर ट्रेमध्ये सात ते आठ तास सुकविल्या जातात.
-त्यानंतर ग्राइंडरद्वारे पावडर तयार केली जाते.
-प्रत्येक भाजी (Vegetable) वाळवल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या पावडरचे प्रमाण कमी-जास्त राहते.
सरासरी सांगायची तर प्रति किलो भाजीपासून १५० ते २०० ग्रॅम पावडर तयार होते.

विपणन
‘भाज्यांची पावडर’ ही उत्पादन श्रेणी बाजारपेठेत तुलनेने अलीकडील आहे. त्यामुळे त्याबाबत ग्राहकांत अजून प्रबोधन व प्रचार होणे गरजेचे असल्याचे कादे सांगतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, तसेच अन्य सोशल मीडिया तसेच स्वतःची वेबसाइट तयार करून उत्पादनांचे विपणन करण्यास सुरुवात केली. कोरोनाचे संकटही होतेच. पण कादे यांनी हिंमत न हारता प्रयत्नात सातत्य ठेवत काम सुरूच ठेवले. या उत्पादनांना सर्वाधिक मागणी ही महानगरांतील ग्राहकांकडून अधिक असल्याचे जाणवले. त्यानुसार मुंबई, बंगळूर, पुणे, नागपूर, हैदराबाद, छपरा, लखनौ, सेलम आदी शहरांमधून त्याची विक्री करण्यावर भर दिला. हॉटेलमध्येही काही प्रमाणात मागणी आहे. ऑनलाइन फ्लॅटफार्म’ वरील आघाडीच्या
कंपन्यांकडेही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
‘एसएसएआयआय’ तसेच अन्य परवानेही घेतले आहेत.

kade Owner of Ganesha Brand
सांगली कृषी महोत्सवात सेंद्रिय उत्पादनांना सर्वाधिक मागणी

मागणी तसा पुरवठा
विक्रीची अडचण होऊ नये यासाठी मागणी तसा पुरवठा हे सूत्र अवलंबले. त्यामुळे नुकसान तर टळतेच. शिवाय ग्राहकांनाही ताजे उत्पादन पुरवता येते. सात प्रकारच्या पावडरींचे दर किरकोळ फरक वगळता जवळपास समान आहेत. कांदा, आले, लसूण आणि आवळ्याची पावडर थोडी महाग आहे. त्यांचा दर प्रतिकिलो ६०० ते ८०० रुपयांपर्यंत तर टोमॅटो, कढीपत्ता, शेवगा पान यांचे दर ५०० ते ६०० रुपयांपर्यंत आहेत.

पावडरचे उपयोग

कादे सांगतात, की कांदा, लसूण यांच्या ओल्या पेस्ट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र त्यांना पावडरचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यांचा वापर स्वयंपाकात करता येतो. टोमॅटो पावडरचा उपयोग सूप तयार करण्यासाठीही होऊ शकतो. तसेच काही पावडरी सॅंडवीचसारख्या पदार्थांमध्येही उपयोगात आणता येतील. साधारण १२ महिने त्यांची टिकवणक्षमता आहे.

आकर्षक पॅकिंग

मागणीप्रमाणे २००, ५०० ग्रॅम आणि एक किलो पॅकिंग केले जाते. सीलिंग मशिनही घेतले
आहे. बाहेरून ब्राऊन पेपर व आतून फूड ग्रेड प्लॅस्टिक मटेरिअल असे पॅकिंगचे स्वरूप आहे.

संपर्क: सुदर्शन कादे, ७०५७७६५०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com