कधीकाळी विकासापासून कोसो मैल दूर व आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे गाव म्हणून धुळे जिल्ह्यातील काळगाव (ता. साक्री) ओळखले जायचे. मात्र जिद्दी गावकऱ्यांनी लोकसहभाग व शासनाचे पाठबळ सोबतीला घेतले. जलसंधारण, कृषी आणि ग्रामविकासात भरीव कार्य व प्रगती साधली. आज निर्यातक्षम डाळिंब उत्पादक गाव म्हणून गावाने ओळख तयार केली आहे. एकजुटीने प्रयत्न केले तर दुष्काळाला हरवता येते, डोंगरदऱ्यांमध्ये समृद्धी फुलू शकते हे काळगावने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे..धुळे जिल्ह्यातील काळगाव (ता. साक्री) म्हणजे चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला जंगलमय भाग एवढीच ओळख होती. गावात १९७६ मध्ये वीज पोहोचली खरी. पण शेती पावसाच्या भरवशावरच होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे देशी गायी होत्या. आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे हे एकेकाळचे गाव होते. भूजल पातळी शंभर फुटांपर्यंत खोल खालावली होती. बोटावर मोजणारे शेतकरी बागायती शेतीत होते. दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागे. पाण्याची शाश्वती निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही हे ओळखून ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामांना सुरवात केली. सुमारे तीन लाख रुपये जमा करून गावातील सोनाऱ्या नाल्याचे खोलीकरण केले. त्यातूनच पुढील कामांची मुहूर्तमेढ रोवली गेली..Village Development: लहान आर्वी ग्रामपंचायतीत ‘सीईओं’नी घेतला आढावा .गाव झाले पाणीदारपुढे २०१६ मध्ये शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासाठी गावाची निवड झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामे झाली. चार किलोमीटर लांबीचा नाला १५ फूट खोल आणि सुमारे पाच फूट रुंद करण्यात आला. लोकसहभाग व श्रमदानातून सोनाऱ्या नाला माती बंधारा काम, सात ठिकाणी सिमेंट बंधारे, वनक्षेत्रात सलग समतल चर खोदकाम करून ’पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम पूर्ण केली. जुनागाव पाझर तलाव,काळ्याभूत, हजारे नाला काढूखनाला, सिमेंट बंधारा यातील गाळ उपसा करण्यात आला. गावातील विहिरीपर्यंत २७ ठिकाणी नाला खोलीकरण करण्यात आले. डोंगर उतारावर गॅबियन आणि माती बांध घातले गेले. माथा ते पायथ्यापर्यंत ‘सलग समतल चर’ खोदून पावसाचा थेंब न थेंब जिरविण्यात आला. त्यातून पाणी साठवणूक क्षमता दुपटीने वाढून गाव पाणीदार होण्यास मदत झाली..कृषी विस्तारातून समृद्धीकडेमागील आठ वर्षांत पाणीटंचाई गावाने पाहिलेली नाही. भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे. उन्हाळ्यात देखील विहिरींना पाणी असते. गावातील नाला प्रवाहित आहे. काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात विहिरीमधील गाळ काढण्याची कामे सुरू असायची. मागील सहा वर्षांत गावाने विहिरीचा तळ पाहिलेला नाही. विहिरीतील थोड्याफार पाण्यावर पूर्वी उन्हाळी भुईमूग केला जात असे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर द्राक्ष, डाळिंब लागवडीही केल्या. मात्र पाण्याअभावी फलोत्पादन शक्य नव्हते आज पाण्याने समृद्धी आणली आहे. सूक्ष्मसिंचन पद्धतीने पाण्याचा काटेकोर वापर होतो. शेतकरी कांदा, शेवगा, सीताफळ, तूर, गवार व अन्य भाजीपाला पिकांकडे वळले आहेत. निर्यातक्षम डाळिंब उत्पादक अशी गावाची ख्याती झाली आहे. येथील डाळिंब नेपाळ, बांगलादेश, आखाती देशांत पाठवण्यात येते..Village Development: किन्हीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा करा .प्रगतीत झाले रूपांतरएकेकाळी गरिबीचे चटके सोसलेल्या काळगावच्या शेतकऱ्यांच्या घरी आर्थिक सुबत्ता आली आहे. टुमदार बंगले, त्यासमोर वाहने, ट्रॅक्टर, यांत्रिकीकरण आहे. दुग्ध, कुक्कुटपालन व्यवसाय पुढे आले आहेत. कृषी विभागाच्या योजना, सिंचन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. नवी पिढी उच्च शिक्षण घेत आहेच. शिवाय शेतीतही उतरली असून त्यांच्यात प्रयोगशीलता भिनली आहे. कृषी विस्तारातून समृद्धीकडे’ हे ब्रीद घेऊन शेतकरी प्रगती साधत आहे. ग्रामपंचायतीने आपल्या सहा एकर पडीक जमिनीवर आंबा, पेरू, सीताफळ आणि नारळाची लागवड केली आहे. लिलावांच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी मोठी मदत होत आहे..काळगावातील ठळक विकासकामेभौगोलिक क्षेत्र १६९९.९५ हेक्टर. कृषक क्षेत्र सुमारे ३५० हेक्टर.लोकसंख्या सुमारे १०९३.गावचे ‘राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार’ येणाऱ्यांचे लक्ष वेधते.ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत. विषयनिहाय विविध समित्या.आदिवासी बांधवांसाठी एकलव्य सामाजिक सभागृह बांधकाम.गल्ल्या व आदिवासी वस्तीत सिमेंट काँक्रीट रस्ते.बस स्टॅण्ड बांधकाम.कार्यक्रमांसाठी सामाजिक सभागृह (मंगल कार्यालय)सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड..Sustainable Village Development: राज्यपालांनी घातली शाश्वत ग्रामविकासाची साद.बचत गटांमार्फत महिलांना रोजगारासाठी साह्य.दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना शेळी वाटप योजना.रस्त्यांलगत वृक्ष लागवड व संगोपन.गावातील आदिवासी बांधव गोपालन करतात. त्या अनुषंगाने चराईला जाणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौद.वृक्षांना सिमेंट ओटे बांधकामविहीर खोलीकरण करून आडवे बोअरिंग.सन २०१६ मध्ये हातपंपावर जलपरी मोटर बसवून दुष्काळात पाणी उपलब्ध करून देण्यात आले.सन २०१७ सोनाऱ्या नालावर वनविभागाची जागा मिळवून विहीर पाइपलाइन.१४६ लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम..मिळालेली शाबासकीवनसंवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी संत तुकाराम वनग्राम पुरस्कार (२०१७)जिल्हा व विभागीय पातळीवर ’जलयुक्त शिवार'' अभियानाचा प्रथम पुरस्कारकेंद्र सरकारचा निर्मल ग्राम..वनसंवर्धन, वन्यजीवांचा आधारसुमारे १३२९ हेक्टर वनक्षेत्र लाभलेल्या काळगावात संयुक्त वनव्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. देशी वनस्पतींच्या प्रजातींचे संवर्धन केले जात आहे. हरिण, तरस, ससे, मोर, तितर व अन्य पशूंच्या जातींचा अधिवास आढळतो. वृक्षतोडीला बंदी आहे. उन्हाळ्यात नैसर्गिक झरे आटले असताना जेसीबी यंत्राच्या साहाय्याने खोलीकरण करून वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले. काळगाव कृषी पर्यटनाच्या दिशेने पावले टाकत आहे. जुनागाव वनक्षेत्रातील तीन नैसर्गिक धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत..जलयुक्त शिवार योजनेत शासनाचे सहकार्य आणि गावकऱ्यांची एकजूट यामुळेच गाव दुष्काळमुक्त झाले. आम्ही कृषिकेंद्रित विकासाला प्राधान्य दिले आहे. इथला तरुण शेतकरी तंत्रज्ञानाच्या जोरावर जागतिक बाजारपेठेशी जोडला गेला आहे. दुष्काळमुक्तीचा ‘काळगाव पॅटर्न’ अन्य गावांसाठी आदर्श असाच आहे. संजय भामरे ९७६४८०७७६५ (कृषिभूषण व माजी सरपंच).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.