France Snail Farming: फ्रान्समधील ‘हेलिकीकल्चर’ उद्योगाचे विश्व
Rural Business Success: फ्रान्समध्ये गोगलगाय पालन एका प्रदेशापुरते मर्यादित नाही. ओव्हेर्न-रोन-आल्प्स, दक्षिण-पूर्व आणि दक्षिण-पश्चिम फ्रान्स तसेच पूर्वेकडील काही भागांत गोगलगाय उत्पादक आढळतात. फ्रान्समध्ये गोगलगाय या छोट्याशा जिवाभोवती खाद्यपदार्थ, प्रक्रिया, सौंदर्यप्रसाधने, स्थानिक विक्री, संशोधन आणि कृषी पर्यटन अशा अनेक मूल्यसाखळ्या तयार झाल्या आहेत.