Jackfruit Farming: शेतकरी निर्मित फणस वाण झाले लोकप्रिय
Farmer Developed Jackfruit Varieties: कर्नाटक जिल्ह्यातील तुमकूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी फणसाचे वैशिष्ट्यपूर्ण वाण विकसित केले. परंतु कथा इथेच संपत नाही. बंगळूर येथील प्रसिद्ध ‘आयआयएचआर’ संस्थेने त्यांच्यासोबत भागीदारी तत्त्वावर व्यावसायिक प्रकल्प राबविला. त्यातून संबंधित संशोधक शेतकऱ्यांच्या वाणांची दर्जेदार रोपे तयार होऊन त्यांची मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रसिद्धी करण्यात आली.