FPC Success Story: परदेशी भाज्यांमधील शेतकरी कंपनी पोहोचली देशातील महानगरांपर्यंत
Agriculture Business: नाशिक जिल्ह्यातील वडगाव (ता. सिन्नर) येथील काही महत्त्वाकांक्षी तरुण एकत्र आले. आपल्या भागातील परदेशी भाजीपाला क्षेत्र, महत्त्व व क्षमता ओळखून त्यांनी ग्रीनबेरी एक्सॉटिक्स शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. देशातील महानगरांमधील बाजारपेठांशी संपर्क साधून त्यांची गरज लक्षात घेतली. सुमारे ४५० शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार केले.