FPO Success Story: शेतकरी हिताला प्राधान्य देत ‘श्रमविकास’ ची झेप
Shramvikas FPO Story: सहा वर्षांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील अंभोरे (ता. संगमनेर) पंचक्रोशीतील शंभर शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘श्रमविकास शेतकरी उत्पादक कंपनी’ची स्थापना केली. केवळ एक लाख रुपयांच्या भागभांडवलातून कामकाज सुरू केलेल्या कंपनीने कांदा, सोयाबीन खरेदी, कांदा बीजोत्पादन यातून दोन कोटी उलाढालीचा टप्पा गाठला आहे. यंदा अडीच कोटीची उलाढाल अपेक्षित आहे.