Women in Agriculture: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका म्हणजे कृष्णा-वारणेच्या खोऱ्यातील सुपीक क्षेत्र. या भागात उसाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. उसासोबत अन्य पिकांमध्येही प्रयोगशीलतेची कास धरणारे शेतकरी येथे पाहण्यास मिळतात. याच मातीतील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील शीतल धनपाल माणकापुरे यांनी प्रयोगशील शेतीचा मार्ग निवडून नवा दृष्टिकोन दिला आहे. शीतल यांचे औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील पदविकेपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपल्या दहा एकर वडिलोपार्जित शेतीतच करिअर करण्याचे पसंत केले. मातीशी असलेली नाळ कायम ठेवली. .शेतीपद्धती व बीटरूट लागवडशीतल यांच्या एकूण दहा एकर क्षेत्रापैकी पाच एकरांवर ऊस, दोन एकरांवर कोबी, एक एकरात केळी आहे. यापूर्वी ऊस आणि द्राक्षाची लागवड ते करायचे. अनेक वर्षे त्यांनी द्राक्ष बागेसाठी प्रचंड कष्ट घेतले. मात्र बदलणारे हवामान, वाढलेला मजुरीचा खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे द्राक्ष शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईना. अखेर द्राक्ष बाग काढून टाकावी लागली. त्यानंतर अन्य व्यावसायिक, नगदी पिकाचा त्यांनी शोध घेतला. .सध्याच्या पीक पद्धतीत त्यांना अजून एक असे पीक घेण्याची इच्छा होती की कमी कालावधीत ते अधिक उत्पादन व चांगला पैसा मिळवून देईल. या काळात एका कृषी प्रदर्शनात नाशिक येथील प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत त्यांची भेट झाली. त्यांच्या भागात बीटरूटची शेती चांगल्या प्रकारे सुरू होती. या शेतकऱ्यांनी शीतल यांना या पिकाचे अर्थकारण व महत्त्व समजावून दिले. शीतल यांना ते पटले देखील. अधिक अभ्यास केल्यानंतर त्यांनी या पिकात उतरण्याचे ठरवले..Women in Agriculture : पुसा येथे जागतिक शेतकरी महिला परिषदेचे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता.बीटरूटचा सुरू झाला प्रयोगसन २०२१ पासून बीटरूट घेण्यास सुरवात झाली. आज सुमारे चार ते पाच वर्षांचा अनुभव या पिकात तयार झाला आहे. नोव्हेंबरच्या दरम्यान त्याची लागवड होते. शीतल सांगतात की या पिकाला खूप कडक ऊन किंवा अति पाऊस मानवत नाही. हिवाळ्यातील मध्यम हवामान अनुकूल ठरते. दरवर्षी दोन एकर क्षेत्र या पिकासाठी राखीव ठेवले जाते. एकरी साधारण दोन किलो बियाणे लागते. जमिनीची मशागत करतानाच खतांच्या मात्रेवर भर देण्यात येतो. .पेरणीवेळी दोन पोती अमोनिअम सल्फेट आणि तेवढीच मात्रा १०:२६:२६ या खताची दिली जाते. त्यानंतर या पिकाला कोणते खत देण्याची गरज भासत नाही. पाच बाय पाच इंच अंतरावर बियाणे पेरले जाते. गरज भासल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि कीडनाशकांचा वापर होते. अन्य भाजीपाला पिकांच्या तुलनेत व्यवस्थापन खर्च कमी लागतो. या पिकाला आठवड्यातून एकदा रेनपाइपद्वारे पाणी द्यावे लागते. स्पिंकलरही फायदेशीर ठरतो. जमीन कायम वाफसा स्थितीत राहील याची खबरदारी घेतली जाते. कूपनलिकेतील पाण्याचा वापर होतो..काढणी व विक्रीचे नियोजनसाधारण ४५ दिवसांनी काढणी सरू होते. काढणी ठरावीक दिवसांच्या काळाने म्हणजे टप्प्याटप्प्याने केली जाते. सुमारे ३५ व्या दिवशी कंद तयार होण्यास सुरुवात होते. सुमारे दोन महिन्यांत प्लॉट संपतो. शीतल यांच्या शेतातून दररोज सुमारे दोन टन माल निघतो. सकाळी सात वाजता काढणीला सुरुवात होते. काढणीच्या वेळेसच मजुरांची अधिक गरज भासते. बाकी लागवड व अन्य कामांसाठी ती तुलनेने कमी असते. या वेळी मजुरांनाही शाश्वत रोजगार मिळतो. एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. .Agriculture Success Story: आठवडी बाजाराचा राजा झालेला एकवीस वर्षीय तरुण .शीतल यांनी व्यापाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करून कोल्हापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड, सांगली आदी महत्त्वाच्या स्थानिक बाजारपेठा तयार केल्या आहेत. शिवाय परिसरातील नांदणी भाजीपाला उत्पादक संघाच्या वाहनातून मुंबई येथे देखील ते माल पाठविण्याची व्यवस्था करतात. अलीकडील वर्षांचा विचार केल्यास प्रति किलो १५ ते ३० रुपये कमाल असा दर मिळतो. दर दहा रुपयांपर्यंत खाली देखील येतो. मुंबईला ४० किलो पॅकिंगची गरज भासते. तर स्थानिक स्तरावर ५० नग बॅगेत भरून पॅकिंग केले जाते. शीतल सांगतात, की प्रक्रिया व अन्य उद्योगातही बीटरूटचा वापर वाढत असल्याने मुंबई येथील व्यापाऱ्यांकडून त्यास चांगली मागणी असते. दोन महिन्यांत हे पीक आम्हाला चांगला पैसा मिळवून देते..पीक फेरपालट आणि जमिनीचे आरोग्यशीतल सांगतात, की माझ्या शेतातील प्रत्येक प्लॉटमध्ये फेरपालट करण्यास महत्त्व दिले आहे. त्यादृष्टीने देखील बीटरूट हे पीक महत्त्वाचे ठरले आहे. बीटरूटची काढणी झाल्यावर रिकाम्या झालेल्या जमिनीत मेथी किंवा कोथिंबीर यासारख्या पिकांची लावण केली जाते. त्यानंतर जुलै महिन्यापर्यंत रान मोकळे ठेवून जमिनीला उन्हात तापू दिले जाते. त्यानंतर आडसाली उसाची लागवड केली जाते. हा ऊस तुटून गेल्यानंतर पुन्हा त्या प्लॉटमध्ये बीटरूट घेतले जाते. दहा एकरांत दरवर्षी आलटून पालटून हे पीक घेण्यात येते. फेरपालट पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर रोग-किडींचे प्रमाणही तुलनेने कमी राहिले असल्याचे शीतल सांगतात..अन्य पिकांनीही वाढविला उत्पन्नस्रोतकोबी हे शीतल यांचे अजून एक महत्त्वाचे पीक आहे. कर्नाटक, हैदराबाद, छत्तीसगड या भागांतील व्यापाऱ्यांकडून त्याची मागणी असते. यंदा किलोला १० ते २० रुपये दर मिळाला. शीतल यांना पत्नी सुचेता यांची मोठी मदत मिळते. त्यांची ऋतुराज व पृथ्वीराज ही दोन मुले पुणे येथे शिक्षण घेत आहेत. कृष्णेच्या पाण्याचीही मोठी साथ आहे. एकूणच प्रयोगशीलता व प्रयत्न यातून शीतल यांनी शेती व कुटुंबाचे अर्थकारण चांगल्या प्रकारे उंचावले आहे.शीतल माणकापुरे ९०२२५८००४४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.