BARTI : ‘बार्टी’ने घडविले तीनशे अधिकारी

Administrator Officers : पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) गेल्या सोळा वर्षांत तब्बल तीनशे प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे मोठे काम केले आहे.
BARTI
BARTIAgrowon

किरण भवरे

पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) गेल्या सोळा वर्षांत तब्बल तीनशे प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे मोठे काम केले आहे. या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये सेवेची संधी मिळाली आहे.

‘बार्टी’चे मुख्यालय पुणे येथे असून २००८ पासून राज्यातील अनुसूचित जातीमधील युवक-युवतींना सनदी अधिकारी होण्यासाठी घडविले जाते. येथे विविध प्रकारच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेतली जाते.

या प्रवेश परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या खर्चाने बार्टी बरोबर सामंजस्य करार झालेल्या खासगी शिकवणी वर्गात प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण केवळ एक वर्ष कालावधीसाठी असते. एवढ्या कमी कालावधीचे प्रशिक्षण घेऊन देखील बार्टीतून सोळा वर्षांत तीनशे सनदी अधिकारी घडले आहेत.

BARTI
SARTHI : योजनांअभावी ‘सारथी’चे चाक रुतलेलेच

बार्टीने केवळ प्रशासकीय सेवेतच - विद्यार्थी घडविले असे नाही तर पोलिस, पोस्ट खाते, रेल्वे, लेखा विभाग, संरक्षण दल, माहिती सेवा, महसूल, परराष्ट्र सेवा, भारतीय व्यापार सेवा, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, सशस्त्र सेना मुख्यालय, यासह राज्य शासनाच्या महसूल विभागासह इतर विभागातही अधिकारी दिले आहेत. दिल्ली, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रशिक्षण देत आहेत.

नावीन्यपूर्ण योजना बार्टी ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम (बीओपीपी)

परदेशातील अनेक देशांतील कुशल मनुष्यबळासाठी नियोक्त्यांच्या वाढत्या मागणीचा विचार केला. त्यासाठी बार्टी विविध देशांतील कुशल मनुष्यबळाच्या मागणीचे मूल्यांकन करून त्यांना योग्य कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.

कुशल मनुष्यबळाचा पाठ पुरवठा करून त्या देशांमधील मनुष्यबळाच्या मागणीची पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘जीसीसी’ अंतर्गत संयुक्त अरब अमिराती (यूएई) सौदी अरेबिया, बाहरिन, ओमान, कुवेत आणि कतार इत्यादी देशांमध्ये बार्टीमार्फत रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

BARTI
यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी ‘बार्टी’चे मार्फत ३०० विद्यार्थांना प्रशिक्षण

समतादूत विभाग

समतादूत विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरावर समतादूत नेमण्यात आलेले आहेत. समतादूत हे बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना समाजामध्ये पोहोचविण्याचे काम करतात. तसेच सामाजिक सलोखा, बंधुभाव निर्माण करण्यासाठी समतादूत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावितात.

तसेच समतादूतामार्फत अनुसूचित जाती व वंचित/दुर्बल घटकांतील युवक युवतींच्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक विकास साधून आदर्श नागरिक घडविणे या करिता स्वयंसाह्यता, युवागट अंतर्गत युवक-युवतींना स्वविकास व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जातात. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती प्रत्यक्षात अनुसूचित जातीच्या वस्त्यांवर भेट देऊन माहिती देण्याचे काम समतादूत यांच्यामार्फत केले जाते.

शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण

राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्था पुणे (एनआयपीएचटी) या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शेतीपूरक व्यवसायाचे निवासी प्रशिक्षण हे तळेगाव दाभाडे पुणे येथे प्रशिक्षण या संस्थेद्वारे राबविण्यात येणारे कोर्स- कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, रोपवाटिका व्यवस्थापन, शेडनेटहाउस तंत्रज्ञान.

 ०२२२४-२५५४८०/२५५४८१ - ९४२३०८५८९४/९४२३२०५४१९

- बालाजी लोखंडे, ९४२३७५४७३५ जनसंपर्क अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com