Crop Residue Management: पीक अवशेषांतून जपले मातीचे आरोग्य; नानोटे यांचे सुपीकता टिकविण्याचे प्रयोग
Agriculture Success Story: अकोला जिल्ह्यातील निंभारा येथील गणेश श्यामराव नानोटे यांनी पीक अवशेषांचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. केंद्र शासनाने यंदाच्या २२ ऑक्टोबरपासून जाहीर केलेल्या ‘शेत वाचवा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर नानोटे यांचे प्रयोग आज हवामान बदलाच्या काळात अभ्यास विषय ठरावा इतके महत्त्वाचे आहेत.