Frozen Food Business Success: आर्थिक शिस्तीतून शेतीमाल फ्रोझन व्यवसायात साधली प्रगती
Startup Success Story: एखाद्या व्यवसायात अपयश आले तर अनेक जण हातपाय गाळून बसतात. पण आर्वी, ता. जुन्नर येथील अजय ढवळे या अभियंत्याने केवळ २० हजार रुपये भांडवलातून शेतीमाल फ्रोझन व्यवसायात उतरण्याचे धाडस केले. ५०० लिटरचा डीपफ्रिज आणि ग्रीनपीस विक्रीचा २०२१ मध्ये सुरू केलेला व्यवसाय आर्थिक शिस्तीमुळे आज वार्षिक चार कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे.