पुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्याच्या हद्दीवर असलेले तळेगाव ढमढेरे येथील अनेक पेरू उत्पादक किरकोळ व्यापाऱ्यांना पेरूची थेट विक्री करतात. यापैकीच एक आहेत प्रयोगशील युवा शेतकरी गिरीश भुजबळ. पेरूच्या थेट विक्रीतून चांगला दर मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याचबरोबरीने विविध हंगामी पिकांच्या लागवडीतून त्यांनी उत्पन्नाचा स्रोत वाढविला आहे. पुणे शहरातील गुलटेकडी मार्केट आणि पेरणे फाटा येथे पेरू विक्रीसाठी चांगल्या सुविधा आहे. त्यामुळे तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर,जि.पुणे) परिसरातील शेतकऱ्यांचा पेरू लागवडीकडे कल वाढत आहे. तळेगाव ढमढेरे येथील पेरू उत्पादक युवा शेतकरी गिरीश आनंदराव भुजबळ यांची बारा एकर शेती आहे. त्यामध्ये मिरची, सोयाबीन, तूर, कोथिंबीर, मेथी, शेवगा, बटाटा या पिकांची ते लागवड करतात. संपूर्ण शेतीच्या बांधावर त्यांनी सीताफळाची लागवड केलेली आहे. याचबरोबरीने शेवगा एक एकर, पेरू एक एकर लागवड आहे. २००२ मध्ये त्यांनी पेरूच्या सरदार जातीची लागवड केली. साधरणपणे तीन वर्षानंतर पेरूचे उत्पादन सुरू झाले. योग्य मशागत आणि बागेच्या व्यवस्थापनामुळे दर्जेदार पेरूचे वाढू लागले. बागेच्या व्यवस्थापनात वडील आनंदराव, आई सौ.रतनबाई आणि पत्नी सौ.सारिका यांची चांगली मदत होते. शेतीच्या व्यवस्थापनासाठी ४ कायमस्वरूपी मजूर आहेत. पेरू बागेचे व्यवस्थापन
विक्रीचे नियोजन
प्रतवारी करून विक्री
ऑगस्ट ते ऑक्टोबर सर्वाधिक मागणी साधारणपणे मार्च महिन्यात बागेची छाटणी केली जाते. त्यानंतर चार महिन्याने पेरू उत्पादन सुरू होते. पेरूचा हंगाम प्रामुख्याने डिसेंबरपर्यंत असतो. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक मागणी असते. तसेच दरही चांगला मिळतो. पेरूतून चांगली उलाढाल साधारणपणे जून ते डिसेंबर मुख्य हंगामामध्ये ग्राहकांची पेरूला चांगली असते. या काळात किरकोळ विक्रेते बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सरासरी ३० ते ६० किलो आणि मोठे व्यापारी १०० ते २०० किलोपर्यंत पेरूची खरेदी करतात. हंगामाच्या काळात भुजबळ दर महिन्याला सुमारे दोन टन पेरूची विक्री करतात. त्यातून ५० ते ६० हजार रुपये मिळतात. दरवर्षी पेरूचे एकरी पाच ते सहा टनाचे उत्पादन मिळते. खर्च वजा जाता एका एकरातून साधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न भुजबळ यांना मिळते. इतर पिकातूनही चांगले उत्पन्न सध्या पेरू पिकांव्यतिरिक्त शेवगा, तूर, मिरची, सोयाबीन, कोथिंबीर लागवड भुजबळ यांनी केली आहे. या शेतमालाची विक्री पुणे तसेच वाशी मार्केटमध्ये केली जाते. त्यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळते. शेवग्याचा फेब्रुवारी ते जून असा हंगाम असतो. पुणे बाजारपेठेत २५ ते ३० रुपये किलोने विक्री होते. दरवर्षी एक एकरावर कोथिंबीर, मेथीची हंगामानुसार लागवड असते. या पालेभाजीतूनही चांगला नफा मिळविण्याचा भुजबळ यांचा प्रयत्न असतो. संपर्क- गिरीश भुजबळ, ९८२२८२४२१८ (संपर्क वेळ संध्याकाळी सात नंतर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.