Turmeric is polished by machine.
Turmeric is polished by machine.

हळद काढणी ते ‘पॉलिशिंग’-प्रतवारी

वसगडे (जि. सांगली) येथील सुधीर जाधव यांनी मित्र वसंत पडळकर यांच्या सोबत हळद काढणी ते यंत्राद्वारे पॉलिशिंग, प्रतवारी करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. वर्षाला सुमारे १५० शेतकरी व सहाहजार क्विंटल हळदीवर प्रक्रिया करून सुमारे १० ते १२ लाख उलाढाल होण्यापर्यंतचे यश त्यातून साध्य झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही बांधावरच सेवा मिळून त्यांचे श्रम व वेळेत बचत झाली आहे.

वसगडे (जि. सांगली) येथील सुधीर जाधव यांनी मित्र वसंत पडळकर यांच्या सोबत हळद काढणी ते यंत्राद्वारे पॉलिशिंग, प्रतवारी करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. वर्षाला सुमारे १५० शेतकरी व सहाहजार क्विंटल हळदीवर प्रक्रिया करून सुमारे १० ते १२ लाख उलाढाल होण्यापर्यंतचे यश त्यातून साध्य झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही बांधावरच सेवा मिळून त्यांचे श्रम व वेळेत बचत झाली आहे. सांगली शहरापासून सुमारे तीस किलोमीटरवर येरळा नदीकाठी वसलेले पलूस तालुक्यातील गाव अशी वसगडेची तर द्राक्ष आणि ऊस शेतीत अग्रेसर अशी तालुक्याची ओळख आहे. वसगडे गावात ऊस पिकासोबत हळदीचे पीकही घेतले जाते. येथील सुधीर श्रीकांत जाधव यांची पाच एकर शेती आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम.कॉम जीडीसी ॲण्ड ए अशी पदवी घेतली. त्यानंतर ‘डेअरी’ क्षेत्रात नोकरी केली. परंतु पुरेसा पगार नसल्याने घरच्या शेतीची जबाबदारी घेतली. केवळ शेतीवर अवलंबून न राहता अनुभवाच्या जोरावर गावातच डेअरी सुरू केली. त्यामुळे शेती आणि डेअरीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आर्थिक सक्षमता आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. समस्या ओळखल्या सुधीर सन २००८ पासून हळद घेतात. हळदीत काढणीपासून ते शिजवणे, पॉलिश व प्रतवारी या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. पूर्वी फारसे यांत्रिकीकरण नव्हते तेव्हा हळद शेतात शिजवल्यानंतर ती सांगली येथे मिलमध्ये आणून पॉलिश केली जायची. या संपूर्ण प्रक्रियेला विलंब व्हायचा. कणी हाती लागत नसल्याने काही प्रमाणात आर्थिक तोटा व्हायचा. आपणच मार्ग काढला तर काढणीपश्‍चात प्रक्रिया वेळेत, कमी श्रमात व मजूरबळात करता येईल असा विचार झाला. परंतु तितके भांडवल नसल्याने यात चार वर्षांचा काळ गेला. व्यवसायाची संधी

  • सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कवठे येथे शेतीतील यंत्रे तयार केली जातात याची जुजबी माहिती होती. त्या माहितीच्या आधारावर तेथील कारखान्यात सुधीर गेले असताना हळदीचे पॉलिशिंग व सोबत प्रतवारीही करणारे यंत्र पाहिले. त्याची सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक पाहिले. हळद शिजविण्यासाठी लागणारा कुकरही घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतातील कामे यंत्राद्वारे करण्याबरोबरच भाडेतत्त्वावर ही यंत्रे देऊन दोन पैसे अधिक मिळवण्याची संधी सुधीर यांनी ओळखली.
  • मित्र वसंत पडळकर यासही व्यवसायात भागीदार करून घेतले. काढणी आणि हळद शिजवणे ही जबाबदारी वसंत यांनी, तर पॉलिशिंग व प्रतवारी ही सुधीर यांनी सांभाळायची असे ठरले. त्यानुसार व्यवसाय उभारणी सुरू केली. यंत्रांची खरेदी करणे महत्त्वाची होती. पैशांची कमतरता होती. हळद पॉलिश व प्रतवारी यंत्राची सव्वादोन लाख तर कुकरची तीन लाख रुपये किंमत होती. मग मित्रांकडून उसनवारी, भिशी या माध्यमातून पैशांची तरतूद झाली.
  • मैत्री जपली वसंत हा जवळचा मित्र. पण त्याच्याकडे पुरेसे भांडवल नव्हते. तरीदेखील त्याला सोबत घेऊन काम करताना पन्नास टक्के भागीदारी देण्याचे ठरवले. वसंत यांचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी. दुष्काळी भाग असल्याने वडील वसगडे येथे स्थायिक झाले. सांगली बाजार समितीत ते हमाली काम करायचे. सुधीर सांगतात की इयत्ता सातवीत असल्यापासून आम्ही मैत्री जपली आहे. व्यवसायातील बाबी

  • गेल्या सात वर्षांपासून व्यवसायात कार्यरत. हळद काढणीपासून, खांदणी, मोडून देणे, शिजवणे, पॉलिशिंग व प्रतवारी अशी सर्व सेवा दिली जाते. ट्रॅक्टर, मजूर, यंत्रे सर्व सुधीर यांचेच असते.
  • वर्षभरात सुमारे १५० शेतकऱ्यांना व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव, तासगावसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकातील अथणीपर्यंत नेटवर्क.
  • शिजविण्यासाठी प्रति कुकर (३५० किलोचा) १५० रुपये शुल्क घेतले जाते.
  • पॉलिशिंग झाल्यानंतर यंत्र त्वरित प्रतवारीही करून देते. कणी, मध्यम व ए ग्रेड अशी प्रतवारी, यंत्र दोन तासांत सात ते आठ क्विंटलपर्यंत प्रक्रिया करून देते. ४० रुपये प्रति क्विंटल असा दर.
  • शेतकऱ्यांना सर्व सोयी बांधावरच मिळत असल्याने श्रम, मजूरबळ, वेळ या गोष्टींत बचत त्यांना करता येते. प्रतवारीमुळे योग्य दर मिळवता येतो. शेतकऱ्यांना पोत्याचे वजन करून दिले जाते. यामुळे बाजारात विक्रीला गेल्यानंतर आपण केलेल्या वजनात किती फरक पडतो याची माहिती मिळते.
  • वर्षाला सर्व कामे मिळून सहाहजार क्विंटल हळदीवर प्रक्रिया होते. पॉलिशिंग व प्रतवारीतून सुमारे साडेसात लाख तर शिजवणीतून पाच ते सहा लाख तर सरासरी वर्षाला १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल होते. सुधीर यांच्याकडे पालाकुट्टी, रोटर सह अन्य यंत्रे देखील आहेत.
  • प्रतिक्रिया अनेक वर्षांपासून यंत्राद्वारे प्रतवारी करीत आहे. त्यातून मजूरखर्चात १० टक्के बचत होत असून वेळेत काम पूर्ण होते. प्रतवारीमुळे हळदीला प्रति किलोस २० ते २५ रुपये अधिक दर मिळण्यासही मदत झाली आहे. - जितेंद्र प्रकाश पाटील हळद उत्पादक, नांद्रे, ता. मिरज छोट्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सुधीर सांगतात की पॉलिशिंग व प्रतवारी करणारे मी आणलेले सांगली जिल्ह्यातील पहिले यंत्र असावे. त्यात गरजेनुसार काही बदलही केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनेक वेळा यंत्रांच्या किमती परवडणाऱ्या नसतात. यंत्राची कार्यक्षमता पाहता तेवढी हळद उपलब्धताही अशा शेतकऱ्यांकडे होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सुरू केलेल्या व्यवसायाचा त्यांना चांगला उपयोग होत आहे. पूर्वी प्रक्रियेतील काही बाबी शेतकऱ्यांना सांगली येथे जाऊन करून घ्याव्या लागत. त्या बंद खोलीत व्हायच्या. आम्ही मात्र त्यांच्यासमोर त्या करीत असल्याने शेतकऱ्यांत विश्‍वासार्हता तयार केली आहे. संपर्क ः सुधीर जाधव, ९७६७४५०००३ वसंत पडळकर, ९३२५५५१५२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com